Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरात होणार 122 कोटींचे डीपी रस्ते | नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका 

HomeBreaking Newsपुणे

Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरात होणार 122 कोटींचे डीपी रस्ते | नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका 

गणेश मुळे Feb 27, 2024 2:30 PM

Wakdewadi | Shasan Aaplya Dari | वाकडेवाडी परिसरात राबवण्यात आला  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम | संतोष लांडगे आणि सोनाली लांडगे यांचा पुढाकार 
Tamhini Ghat Bus Accident | ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्तांसाठी देवदूतांसारखे धावून आले एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक !
Mahatma Phule Memorial Bhavani Peth |  महात्मा फुले स्मारक परिसरात झालेली अस्वच्छता व असामाजिक तत्वांचा उच्छाद तातडीने बंद करा

Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरात होणार 122 कोटींचे डीपी रस्ते | नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका

पुणे – (The Karbhari Online) : महंमदवाडी परिसरातील (Mohammadwadi Pune) नागरिकांची आता वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. कारण परिसरात 122 कोटींचे डीपी रस्ते (DP Road Pune) निर्माण केले जाणार आहेत. शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हे प्रकल्प तडीस जाणार आहेत. (Pune News)
प्रशासनाने या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ नुकताच म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. अशी माहिती प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. भानगिरे यांनी पुढे सांगितले कि, या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जातीने लक्ष दिल्याने निधी मिळण्यात गती मिळाली. मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनासोबत सातत्याने संवाद साधून निधीची तरतूद करून दिली. यामुळे हा प्रकल्प आता लवकरच आकाराला येईल.

– महंमदवाडी परिसरात अशा पद्धतीनं होणार आहेत रस्ते

1. महंमदवाडी स नं 1, 2, 3, 4, 96, 59, 58 मधून जाणारा 24 मीटर डीपी रस्ता विकसित करणे – निधी 40 कोटी
2. स नं 40 ते स नं 76 मधून जाणारा 30 मीटर डीपी रस्ता लगत असलेला 18 मीटर डीपी रस्ता विकसित करणे – निधी : 18 कोटी
3. महंमदवाडी ते रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट पर्यंत रस्ता विकसित करणे – निधी : 64 कोटी
परिसरातील शेतकऱ्यांची तसेच नागरिकांची मागणी होती कि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी डीपी रस्ते तयार केले जावेत. मात्र यासाठी निधीची तरतूद होत नव्हती. त्यामुळे आम्ही प्रशासनासोबत सातत्याने पाठपुरावा करून रस्ते तयार करण्यासाठी निधीची तरतूद करून घेतली. त्यानुसार आता कामाचा शुभारंभ झाला आहे. महंमदवाडी परिसरातील रस्ते चकाचक होऊन नागरिकांची  वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
प्रमोद नाना भानगिरे, शिवसेना शहर प्रमुख.