PMC Pune Flyover | दांडेकर पूल आणि बिंदू माधव ठाकरे चौकात उभारले जाणार ग्रेड सेपरेटर/उड्डाणपूल  | प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची केली जाणार नियुक्ती 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Flyover | दांडेकर पूल आणि बिंदू माधव ठाकरे चौकात उभारले जाणार ग्रेड सेपरेटर/उड्डाणपूल  | प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची केली जाणार नियुक्ती 

गणेश मुळे Feb 27, 2024 6:04 AM

Engineer’s Day | PMC Cycle Rally | पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन च्या सायकल रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद
Water budget submitted by Municipal Corporation to Water Resources Department | 20.90 TMC of water demanded for Pune city
Advance | PMC Pune | उचल रकमेबाबत लेखा व वित्त विभागाचे नवीन आदेश

PMC Pune Flyover | दांडेकर पूल आणि बिंदू माधव ठाकरे चौकात उभारले जाणार ग्रेड सेपरेटर/उड्डाणपूल

| प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची केली जाणार नियुक्ती

PMC Pune Flyover | पुणे | पुणे महापालिकेच्या वतीने सिंहगड रोडवरील दांडेकर पूल (Dandekar Pul Sinhgadh Road) या ठिकाणी आणि संगमवाडी बिंदू माधव ठाकरे चौकात (Sangamwadi Bindu Madhav Thackeray Chowk) ग्रेड सेपरेटर/ उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी सल्लागाराची (Consultant) नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
स्थायी समितीच्या प्रस्तावानुसार दांडेकर पूल परिसरात जो उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे, त्याच्या प्री आणि पोस्ट टेंडर ऍक्टिव्हिटी आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. याबाबत प्रकल्प विभागाकडून (PMC Project Department) टेंडर प्रक्रिया लागू करण्यात आली होती. यात सबडक्शन झोन यांचा सर्वात कमी दर म्हणजे प्रकल्पीय रकमेच्या 1.110% दर आला आहे. त्यामुळे या कंपनीला काम देण्याबाबत खात्याने शिफारस केली आहे. यात प्री टेंडर फी 0.5% आणि पोस्ट टेंडर फी 0.61% अशी रक्कम दिली जाणार आहे. यासाठी एकूण 40 कोटींची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.
त्याचप्रमाणे संगमवाडी बिंदू माधव ठाकरे चौकात देखील उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्याच्या प्री आणि पोस्ट टेंडर ऍक्टिव्हिटी आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. याबाबत प्रकल्प विभागाकडून टेंडर प्रक्रिया लागू करण्यात आली होती. यात सोविल लिमिटेड  यांचा सर्वात कमी दर म्हणजे प्रकल्पीय रकमेच्या 1.10% दर आला आहे. यासाठी 8 निविदा आल्या होत्या. या कामासाठी देखील 40 कोटींची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे.