PMC Fireman Recruitment Results | फायरमन पदाच्या अंतिम निवड यादी बाबत निवड समितीची बैठक संपन्न! 

HomeBreaking Newsपुणे

PMC Fireman Recruitment Results | फायरमन पदाच्या अंतिम निवड यादी बाबत निवड समितीची बैठक संपन्न! 

गणेश मुळे Feb 09, 2024 3:19 PM

PMC Fireman Recruitment Results  |  Final selection list likely to be released in next 8-10 days!
PMC Fireman Recruitment Results |  Finally, the final selection list for the post of fireman is published
PMC Fireman Recruitment Results | अखेर फायरमन पदाची अंतिम निवड यादी प्रसिद्ध | महापालिका प्रशासना कडून तात्काळ हंगामी नेमणुका! 

PMC Fireman Recruitment Results | फायरमन पदाच्या अंतिम निवड यादी बाबत निवड समितीची बैठक संपन्न!

 | येत्या 8-10 दिवसांत अंतिम निवड यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता!

PMC  Fireman Bharti Results | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation Recruitment) वतीने फायरमन (Fireman) पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र अंतिम निवड यादी प्रसिद्ध होणे बाकी आहे. याबाबत निवड समितीची (PMC Selection Committee) आज बैठक झाली. यामध्ये विविध तांत्रिक मुद्द्यांबाबत चर्चा झाली. त्यानुसार आता येत्या 8-10 दिवसांत अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या (PMC General Administration Department) वतीने देण्यात आली.  (Pune Mahanagarpalika Fireman Bharti Results)
पुणे महापालिकेच्या वतीने 320 पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यातील 200 जागा या फायरमन पदाच्या होत्या. त्यानुसार महापालिकेकडे 3500 हून अधिक अर्ज आले होते. या उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. 120 मार्कांची परीक्षा होती. यात किमान 54 गुण मिळणे आवश्यक होते. यात 666 लोक उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षेसाठी 575 उमेदवार पात्र ठरले होते. त्यानुसार शारीरिक चाचणी परीक्षा  ही 26 ते 29 ऑक्टोबरला आणि 22 नोव्हेंबर ला घेण्यात आली होती.  त्यानुसार या चाचणीचे गुण महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर अग्निशमन साहित्य ओळख बाबत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यासाठी 5 गुण होते. परीक्षेची उमेदवाराची उत्तरपत्रिका आणि योग्य विवरणी महापालिका वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली होती. याबाबत काही हरकती असतील तर त्या देण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर ‘अग्निशमन साहित्याची ओळख’ यामधील उत्तरांबाबत आणि गुणांबाबत उमेदवारांकडून प्राप्त झालेल्या हरकती विचारात घेऊन उमेदवारांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करण्यात आलेली आहे. पुनर्तपासणीमध्ये बदल झालेल्या उमेदवारांच्या सुधारित गुणांचा तक्ता व संबंधित उत्तरपत्रिका मनपा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली.   Pune Municipal Corporation recruitment)

: निवड समितीच्या बैठकीत तांत्रिक मुद्द्यांवर चर्चा

दरम्यान अंतिम निकालासाठी उमेदवारांना काही दिवसांचीच वाट पाहावी लागणार आहे. या सगळ्या भरती प्रक्रिये बाबत निवड समितीची बैठक 9 फेब्रुवारीला म्हणजे आज घेण्यात आली. आरक्षण, गुण प्रक्रिये, माजी सैनिक पात्रता याबाबत सविस्तर चर्चा समिती सदस्यांनी केली. त्यानुसार आता येत्या 8-10 दिवसांत अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल. असा विश्वास सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आला.