Vikram Kumar PMC Commissioner | मुख्य सभेचे ठराव धाब्यावर बसवणाऱ्या महापालिका आयुक्तांची बदली करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

Homeपुणेsocial

Vikram Kumar PMC Commissioner | मुख्य सभेचे ठराव धाब्यावर बसवणाऱ्या महापालिका आयुक्तांची बदली करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी 

गणेश मुळे Feb 05, 2024 12:46 PM

PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | दुरुस्तीच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता
Pune Municipal Corporation (PMC) Commissioner will present the PMC budget on March 7!
PMC Shahari Garib Yojana | शहरी गरीब योजनेची मर्यादा 1 लाख 60 हजार करण्यास स्थायी समितीची मान्यता | मुख्य सभेसमोर प्रस्ताव

Vikram Kumar PMC Commissioner | मुख्य सभेचे ठराव धाब्यावर बसवणाऱ्या महापालिका आयुक्तांची बदली करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

| विवेक वेलणकर यांनी केली मागणी

Vikram Kumar PMC Commissioner | लोकप्रतिनिधींच्या सर्वसाधारण सभेने (PMC Général Body) केलेल्या ठरावाला धाब्यावर बसवून सलग दुसऱ्या वर्षी पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प (Pune Municipal Corporation Budget) वेळेवर सादर न करणाऱ्या  पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (Vikram Kumar IAS) यांची तातडीने बदली करावी. अशी मागणी सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar Sajag Nagrik Manch) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
१५  जानेवारीपूर्वी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक
वेलणकर यांच्या निवेदनानानुसार  वार्षिक अर्थसंकल्प हा कोणत्याही महापालिकेच्या कारभाराचा कणा असतो. तो वेळेवर तयार करणे हे महापालिका आयुक्तांचे प्रमुख कर्तव्य असते. यासंदर्भात पुणे महापालिकेच्या लोकप्रतिनिधींच्या सर्वसाधारण सभेने  ठराव करून यासंदर्भातील वेळापत्रक निश्चित करून दिले आहे ज्याचे पालन करणे आयुक्तांना बंधनकारक आहे. या ठरावाप्रमाणे दरवर्षी १५  जानेवारीपूर्वी आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करणे आवश्यक आहे. (Pune PMC News)
 वेलणकर म्हणाले कि, मात्र गेली दोन वर्षे लोकप्रतिनिधी आणि त्यांची सर्वसाधारण सभाच अस्तित्वात नसल्याने आयुक्त तथा प्रशासक यांनी मनमानी पद्धतीने कामकाज करत अर्थसंकल्पाचे वेळापत्रक बिघडवले आहे. यंदाही अजून हा अर्थसंकल्प तयार झालेला नाही. खरं तर लोकप्रतिनिधी आणि त्यांची सर्वसाधारण सभा अस्तित्वात नसल्याने आयुक्तांनी अधिक जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. ते सनदी नोकर असूनही शहराचे मालक असल्यासारखा मनमानी कारभार करत आहेत.
  मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कि,  सर्वसाधारण सभेने केलेल्या ठरावाला धाब्यावर बसवून अर्थसंकल्पासारख्या महत्वाच्या विषयाचं गांभीर्य घालवणाऱ्या पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांची तातडीने बदली करावी.
 – विवेक वेलणकर, अध्यक्ष,  सजग नागरिक मंच, पुणे