PMC Schools Sanitary Napkins | शहर शिवसेना पुणे मनपाच्या शाळांत सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करण्यास तयार  | प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 

HomeBreaking Newsपुणे

PMC Schools Sanitary Napkins | शहर शिवसेना पुणे मनपाच्या शाळांत सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करण्यास तयार | प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती 

गणेश मुळे Feb 02, 2024 3:50 PM

Khadki Aundh Road | PMC Road Department | एका रात्रीत बनवला खडकी – औंध रस्ता | अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेच्या पथ विभागाने करून दाखवले
PMC Hospitals | पुणे मनपाच्या हॉस्पिटलमध्ये लिफ्टमन नेमा अन्यथा आंदोलन करू  | शिवसेना नेते पृथ्वीराज सुतार यांचा महापालिकेला इशारा 
Meri Mati Mera Desh | तिरंगा ध्वज वाटपासाठी नोडल ऑफिसरची नेमणूक करण्याचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

PMC Schools Sanitary Napkins | शहर शिवसेना पुणे मनपाच्या शाळांत सॅनिटरी नॅपकिन चा पुरवठा करण्यास तयार | प्रमोद नाना भानगिरे यांची माहिती

PMC Schools Sanitary Napkins | पुणे मनपा शाळेतील (Pune Municipal Corporation school) विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन (PMC School Girl Sanitory napkins) पुरवठा वेळेवर पुरवण्यात पुणे मनपा यंत्रणेला काही विलंब लागत आहे. याबाबत शहर शिवसेना आणि अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे (Pramod Nana Bhangire Pune Shivsena) यांनी पुढाकार घेतला आहे. मनपा टेंडर प्रक्रिया होई पर्यंत मनपाच्या सर्व शाळात विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यास आम्ही तयार आहोत. याबाबत आयुक्ताकडे मान्यता देण्याची मागणी केली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली. (PMC School Sanitary Napkins)
पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) शाळांतील विद्यार्थिनींना महापालिके कडून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यात येते. दरवर्षी जवळपास 38 हजार नॅपकिन दिले जातात. यासाठी टेंडर प्रकिया राबवली जाते. कोविड काळापासून ही टेंडर प्रक्रिया बंद करण्यात आली होती. दरम्यान मागील वर्षी महापालिका प्रशासनाकडून नॅपकिन खरेदी ची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. मात्र याविषयी तक्रारी करण्यात आल्याने महापालिकेने ही निविदा प्रक्रिया रद्द केली. मात्र यामुळे मुलींना नॅपकिन मिळण्यास उशीर होत आहे. (Pune PMC News)
याबाबत याबाबत शहर शिवसेना आणि अध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे यांनी पुढाकार घेतला आहे. मनपा टेंडर प्रक्रिया होई पर्यंत मनपाच्या सर्व शाळात विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन पुरवठा शिवसेना पक्षाच्या वतीने करण्यास आम्ही तयार आहोत. याबाबत आयुक्ताकडे मान्यता देण्याची मागणी केली आहे. अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.