Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप

HomeपुणेBreaking News

Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप

गणेश मुळे Jan 22, 2024 11:33 AM

The Karbhari Impact |  The state government is positive about giving botanical garden site for the JICA project  
PMC EV Charging Station | पुणेकरांना पुणे महापलिकेच्या EV चार्जिंग स्टेशनची शुक्रवार पासून मिळणार सुविधा 
PMC Encroachment Action | औंध मधील साई चौकात खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड व पुणे मनपाची संयुक्त कारवाई | आज रात्रीच रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार 

Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | रहाळकर राममंदिरात काँग्रेसने केली महाआरती, भजन, प्रसादाचे वाटप

 

Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth | पुणे  | जय सियारामच्या जयघोषात आणि मंगलमयी उत्साही वातावरणात सदाशिव पेठेतील रहाळकर श्रीराम मंदिरात (Rahalkar Ram Temple Pune Sadashiv Peth) काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Pune Congress Karykartas) आज सोमवारी महाआरती, भजन केले आणि नंतर प्रसादाचे वाटप केले. (Pune Important Places)

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण (Shri Ram Lalla Pran Pratishta) सोहळ्यानिमित्त माजी आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi Pune Congress)  यांच्या पुढाकाराने महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते, त्याला भाविक वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी श्रीरामाचे भजन करण्यात आले, प्रसाद वाटण्यात आला. याप्रसंगी आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), दत्ता बहिरट (Datta Bahirat Pune congress), संजय बालगुडे (Sanjay Balgude Pune Congress), रोहित टिळक (Rohit Tilak Pune Congress), शेखर कपोते, रमेश अय्यर, पूजा आनंद, रजनी त्रिभुवन, लता राजगुरु, बुवा नलावडे, जयसिंग भोसले, प्रविण करपे, स्वाती शिंदे, शानी नौशाद, नरेंद्र व्यवहारे, गौरव बोराडे, प्रथमेश आबनावे, चैतन्य पुरंदरे, रोहन सुरवसे, किशोर मारणे, अनिल आहेर आदी काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

श्रीरामाविषयी सर्व भारतीयांच्या मनात श्रद्धा आहे. श्रीराम हे दैवत प्रत्येक भारतीयाचे आहे, कोणा विशिष्ट व्यक्ती अथवा समूहाचे नाही व कोणा पक्षाचे अथवा संघटनेचेही नाही, या दैवताला पक्षीय, राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न कोणी केला, तरी ते भारतीयांना मान्य होणार नाही. प्रभू रामचंद्रांविषयी सर्वांच्या मनात आस्था आहे. आपल्या सहज बोलण्यातही श्रीरामाचे नाव घेतले जाते हे त्याचेच ऊदाहरण आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना याच श्रद्धायुक्त भावनेने आम्ही प्रभू श्रीरामाची महाआरती केली,असे याप्रसंगी बोलताना मोहन जोशी यांनी सांगितले.

श्रीरामाचा पक्षीय, राजकीय वापर करणाऱ्याना रामरायानेच सदबुद्धी द्यावी अशी प्रार्थना सुद्धा या प्रसंगी रामरायाच्या चरणी करण्यात आली, असे मोहन जोशी म्हणाले.

कॉंग्रेसचे नेते, पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचा शिलान्यास झालेला आहे, पण त्याचा कधीही राजकीय वापर करण्यात आला नाही याचेही स्मरण मोहन जोशी यांनी करून दिले.

रहाळकर राम मंदिराच्या विश्वस्तांच्या वतीने मोहन जोशी, आ.रविंद्र धंगेकर, रोहित टिळक यांचा सत्कार करण्यात आला. महाआरतीचे नियोजन सुरेश कांबळे आणि गोरख पळसकर यांनी केले.