Deep Cleaning Drive | PMC Pune | पुणे महापालिकेची विशेष सूक्ष्म स्वच्छता मोहीम | 22 जानेवारी पर्यंत शहरातील सर्व प्रभागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे नियोजन

HomeपुणेBreaking News

Deep Cleaning Drive | PMC Pune | पुणे महापालिकेची विशेष सूक्ष्म स्वच्छता मोहीम | 22 जानेवारी पर्यंत शहरातील सर्व प्रभागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे नियोजन

गणेश मुळे Jan 20, 2024 2:37 AM

My Bharat | National Youth Day | राष्ट्रीय युवा दिन सप्ताहात पुणे महानगरपालिका व स्वयंसेवी संस्थाचे एकूण  ३८ उपक्रमांचे आयोजन
Shivajinagar Bus Station Pune | अडीच वर्षात शिवाजीनगर येथील बसस्थानाकाचे काम पूर्ण होणार!
MLA Ravindra Dhangekar Vs Dheeraj Ghate | आमदार रवींद्र धंगेकर हवेने भरलेला फुगा | धीरज घाटे यांची टीका 

Deep Cleaning Drive | PMC Pune | पुणे महापालिकेची विशेष सूक्ष्म स्वच्छता मोहीम

| 22 जानेवारी पर्यंत शहरातील सर्व प्रभागातील मंदिरे स्वच्छ करण्याचे नियोजन

Deep Cleaning Drive | PMC Pune | स्वच्छ भारत अभियान (Swachh Bharat Abhiyan), स्वच्छ सर्वेक्षण २०२४ (Swachh Survey 2024) अंतर्गत पुणे महानगरपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation) संपूर्ण शहरात विशेष सूक्ष्म/खोलवर स्वच्छता मोहीमेचे (deep cleaning drive) आयोजन करण्यात येत आहे. हे स्वच्छता अभियान १५ क्षेत्रिय कार्यालयाकडील एकूण ४२ प्रभागांमध्ये दिनांक १७  ते २२ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात स्वच्छता करण्यात येत आहे. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाच्या (PMC Solid Waste Management Department) वतीने देण्यात आली. (Deep Cleaning Drive | PMC Pune)
२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होत असून थोडेच दिवस बाकी आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी संपूर्ण हिंदुस्थानात सर्वात मोठी दीपावली साजरी होत आहे. या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशभर मंदिर व सर्व पुजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे. काल डहाणूकर कॉलनी प्रभू श्रीराम मंदिर स्वच्छ करणे आले यावेळी स्वच्छतेचे ब्रॅन्ड अँबेसिडर व जेष्ठ गायक, संगीतकार, दिग्दर्शक व कवी डॉ. सलील कुलकर्णी (Dr Saleel Kulkarni) आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.केतकी घाटगे यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त श्री विक्रम कुमार ,अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. कुणाल खेमनार व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन श्री.संदीप कदम यांच्या मार्गदर्शनानुसार वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक व अधिकारी / कर्मचारी (आरोग्य विभाग) नवचैतन्य हास्य क्लब, कमिन्स इंडिया लिमिटेड, जनवानी, स्वच्छ संस्था, हर्षदीप फाउंडेशन,
सेवासयोग,नागरिक यांच्या सोबत मंदिर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. माजी आमदार मेधा कुलकर्णी, मा. स्थायी समिती अध्यक्ष श्री. शाम देशपांडे यांच्या हस्ते मंदिरातील आतील परिसराची जेटींग मशिनच्या सहाय्याने पाण्याच्या फवाऱ्याने साफ करण्यात आले. शिवाय पुजा पार्क व प्रभागातील गणपती, म्हसोबा, मारुती, भवानी माता, दुर्गामाता, महादेव, विठ्ठल या विविध देवतांचे मंदीर, तसेच मंदीराच्या बाहेरील परिसर सर्व क्षेत्रातील सन्माननीय लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्वच्छता केली.