Pune PMC News | रस्त्यावर कचरा टाकू न दिल्याने मनपाच्या कंत्राटी  कर्मचारी व नागरिकांमध्ये बाचाबाची!

HomeपुणेBreaking News

Pune PMC News | रस्त्यावर कचरा टाकू न दिल्याने मनपाच्या कंत्राटी कर्मचारी व नागरिकांमध्ये बाचाबाची!

गणेश मुळे Jan 13, 2024 2:06 PM

PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांची पदोन्नतीसाठी आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे धाव
7th Pay Commission | ७ व्या वेतन आयोगापोटी पहिल्या हफ्त्याची रक्कम लवकरच मिळणार!
PMC Recruitment | महापालिका भरती |१३५ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) च्या नेमणुका | ६ महिने असणार प्रशिक्षण कालावधी

Pune PMC News | रस्त्यावर कचरा टाकू न दिल्याने मनपाच्या कंत्राटी  कर्मचारी व नागरिकांमध्ये बाचाबाची!

Pune PMC News | सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय (Sinhagad Road Ward office PMC) हद्दीतील धायरी फाटा येथील ‘माणुसकीची भिंत’ कचरा टाकू न दिल्याने परिसरातील काही नागरिकांनी महापालिकेच्या कंत्राटी सफाई महिला कर्मचारी व मुलांना मारहाण करत शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अभिरुची पोलीस चौकीत तक्रार देखील नोंदवण्यात आली आहे. मात्र असे प्रकार घडत असतील तर कर्मचाऱ्यांनी काम कसे करायचे, असा प्रश्न विचारला जात आहे. (Pune PMC News)
आज १३ जानेवारी रोजी सकाळी काम करत असताना परिसरातील काही नागरिक माणुसकीची भिंत येथे कचरा टाकत असताना आढळले. याबाबत सफाई सेवक कमल आढाळगे यांनी त्यांना कचरा टाकू नका असे सांगितल्यावर या नागरिकांनी सफाई कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकारामुळे ठेकेदार कर्मचाऱ्यांवर सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याची दखल घेत ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी जवळच असलेल्या अभिरुची पोलीस चौकी धाव घेतली व कायदेशीर तक्रार दाखल केलेली आहे. रेखा हरिचंद्र खंडाळे व सपना सुरेश मस्के यांच्याकडून तक्रार देण्यात आली आहे.
घडलेल्या प्रकरणामध्ये सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयामधील अधिकाऱ्यानी लक्ष घालून पुढे असे अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घ्यावी. अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.