PMC Additional Commissioner DPC | पदोन्नती समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला?

HomeपुणेBreaking News

PMC Additional Commissioner DPC | पदोन्नती समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला?

कारभारी वृत्तसेवा Dec 27, 2023 1:12 PM

Only two officers left in the race for the post of PMC Additional Municipal Commissioner!
Senior Citizens Pune PMC News | पुणे महापालिकेत ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष! | लोकशाही दिन देखील साजरा होणार 
Health Minister Dr Tanaji Sawant | पुण्यातील वाढत्या गोवर रुग्णाबाबत आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केली चिंता | शहराच्या आरोग्य व्यवस्थेचा डॉ. तानाजी सावंत यांनी घेतला आढावा

PMC Additional Commissioner DPC | पदोन्नती समितीच्या बैठकीत काय निर्णय झाला?

PMC  Additional Commissioner DPC | पुणे | महापालिका (Pune Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त पदाबाबत (Additional Commissioner PMC) आज पदोन्नती समितीची (DPC) बैठक आयोजित करण्यात आली होती. जवळपास तासभर या बैठकीत चर्चा झाली. मात्र अतिरिक्त आयुक्त कुणाला करायचे, याचा निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे. पदाबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्यात अजून स्पष्टता आणल्यानंतर हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यानुसार पुढील समितीची बैठक राज्य सरकारकडूनच ठरवली जाणार आहे. अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. (Pune Municipal Corporation)
Video conferencing च्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. प्रधान सचिवांच्या अध्यक्षेते खाली ही बैठक घेण्यात आली. यासाठी पुणे मनपामधून महापालिका आयुक्त, तर मंत्रालयामधून  पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त, प्रधान सचिव (नगरविकास 2), आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, उपसचिव, अवर सचिव तसेच कक्ष अधिकारी उपस्थित होते. जवळपास तासभर ही बैठक झाली.
प्रशासनाकडून सेवाज्येष्ठतेनुसार नगर अभियंता यांना पदासाठी प्राथमिकता दिली आहे. त्यानंतर मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर (Chief Account and Finance Officer Ulka Kalaskar), मुख्य अभियंता बोनाला आणि श्रीनिवास कंदूल यांची नावे देण्यात आली होती.  (Pune Municipal Corporation)
या सर्व अधिकाऱ्यांच्या पात्रतेबाबत आणि सेवा ज्येष्ठतेबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र अतिरिक्त आयुक्त करण्याबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्यात अजून स्पष्टता असायला हवी, याबाबत सर्वांचे एकमत झाले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त कुणाला करायचे याबाबत निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. याबाबत आता पुढील बैठकीत निर्णय होणार आहे. त्याची तारीख राज्य सरकारकडूनच ठरवली जाणार आहे.

| प्रशांत वाघमारे पदासाठी इच्छुक नाहीत

दरम्यान नगर अभियंता प्रशांत वाघमारे (City Engineer Prashant Waghmare) हे अतिरिक्त आयुक्त पदासाठी इच्छुक नाहीत. याबाबत वाघमारे यांनीच ‘The Karbhari’ च्या प्रतिनिधीशी बोलताना खुलासा केला आहे. वाघमारे यांनी सांगितले कि, याअगोदर जे मनपाचे अधिकारी अतिरिक्त आयुक्त झाले, ते सर्व मला ज्युनियर होते. तेव्हा देखील मी पात्र ठरत असताना ते पद नाकारले होते. पहिल्यापासूनच मी पदाबाबत इच्छुक नाही. पुढे देखील नसणार आहे. कारण मी जरी पदासाठी पात्र ठरत असलो तरी अभियांत्रिकी सेवेतून प्रशासकीय सेवेत जाण्याची माझी इच्छा नाही. शिवाय मला ज्युनिअर असणारे अधिकारी अतिरिक्त आयुक्त झाले असल्याने मला पदोन्नती समितीत तसे लेखी पत्र देण्याची देखील आवश्यकता नाही.