Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा! | अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव 

HomeBreaking Newsपुणे

Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा! | अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव 

कारभारी वृत्तसेवा Dec 11, 2023 1:10 PM

PMC Health Officer | आरोग्य प्रमुखांचा अतिरिक्त पदभार डॉ कल्पना बळिवंत यांच्याकडे!
Home Minister Amit Shah | देवेंद्र फडणवीस व अमित शहांनी माफी मागून राजीनामा द्यावा : प्रशांत जगताप
River revival project | टीका झाल्यानंतर महापालिकेला आली जाग

Ramesh Shelar News | PMC | रमेश शेलार प्रकरणात आयुक्तांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा!

| अभिप्राय देण्याबाबत अपिल उप समितीत ठराव

Ramesh Shelar News | पुणे | पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागात (PMC Solid Waste Management Department) रमेश शेलार (Ramesh Shelar) हे पर्यावरण व्यवस्थापक (अकार्यकारी) म्हणून काम पाहत आहेत. मात्र अकार्यकारी पद हे प्रशासनाच्या चुकीमुळे माझ्यावर लादले गेले आहे. असे रमेश शेलार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. तसेच आपल्याला दिली गेलेली शिक्षा रद्द करावी, याबाबत स्थायी समिती (PMC Standing Committee) आणि अपील उप समिती (PMC Appellate Sub Committee) कडे अपील केले होते. अपील उप समिती च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला कि याबाबत आयुक्तांनी अभिप्राय द्यावा. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांच्या माध्यमातून अभिप्राय देणार आहेत. या अभिप्राया बाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. (Pune Municipal Corporation)
अकार्यकारी पद देताना प्रशासनाने चुकीचा संदर्भ दिला आहे, असे शेलार यांनी प्रशासनास याआधीच निदर्शनास आणून दिले आहे. तसेच दोन महिने कार्यकारी पद देऊन पुन्हा अकार्यकारी पद प्रशासनाने दिले, हे माझ्यावरच्या आकसापोटी केले असल्याचा आरोप देखील शेलार यांनी केला आहे. तसेच आता तरी प्रशासनाने आपली चूक सुधारून कार्यकारी पद द्यावे, अशी मागणी शेलार यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे आधीच केली आहे. (Pune Municipal Corporation)
त्यानंतर प्रशासनाला शेलार यांनी दुसरे पत्र दिले होते. त्यात त्यांनी म्हटले आहे कि मुख्य  सुरक्षा अधिकारी” (वर्ग-१) पदावरून अकार्यकारी पदभार समकक्ष पद हे वर्ग- २ “सुरक्षा अधिकारी” या पदाशी समकक्ष यादी तत्कालीन महापालिका आयुक्त यांजकडेस मान्यतेसाठी तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे मार्फत तत्कालीन उपआयुक्त सामान्य प्रशासन विभागामार्फत ठेवली होती. वास्तविक माझी निवड “मुख्य सुरक्षा अधिकारी” (वर्ग – १) पदी सरळसेवेने झालेली आहे व हे पद खातेप्रमुखांचे आहे. (PMC Pune News)
खातेनिहाय चौकशी आज्ञापत्रक ३१/०८/२०१९ रोजी पारित झालेनंतर मी सेवेमध्ये पुर्नस्थापीत झालो. तदनंतर तत्कालीन उप आयुक्त सामन्य प्रशासन विभागाने समक्ष चर्चा करून (वर्ग-२) पदांची यादी केली. म्हणजेच मला (वर्ग -१) पदावरून (वर्ग -२) समकक्ष पदावरती अकार्यकारी कामकाज सोपविले यामधून मला पुन्हा जबरी शिक्षा केली अशी माझी धारणा झाली आहे. माझी शैक्षणिक अर्हता त्यावेळी D.C.E,BE(old) Civil, L.L.B, अशी होती कारण माझी सन २००९ रोजी सरळसेवा नेमणूक पद “मुख्य सुरक्षा अधिकारी”पदासाठी L.L.B पदवीस प्राधान्य होते म्हणूनच झालेली आहे. ०१/१०/२०१९ चे निवेदनावरती तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी “GAD मधून हजर करून अकार्यकारी पदावर नियुक्ती देणेबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करणे उचित राहील”. असा शेरा नमूद केलेला आहे. त्यांस तत्कालीन महापालिका आयुक्त यांनी मान्य असे नमूद केलेले आहे. (PMC Pune Marathi News)
वास्तविक त्यावेळी मी सेवेमध्ये कार्यकारी म्हणून “मुख्य सुरक्षा अधिकारी” कामकाज पाहत होतो. ‘मानीव निलंबन’ निलंबन झालेले वर्ग -१ चे अधिकारी सेवेमध्ये आलेनंतर कार्यकारी म्हणून कामकाज पहात आहे. एल.बी.टी विभागाने प्रसिद्ध झालेली संकेतस्थळावरील माहिती व प्रमाणपत्र हा त्याचा भाग आहे. या  सर्व प्रकारामुळे माझे सह महापालिका आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त चा पदावरती पदोन्नतीचा परिणाम झाला आहे.  तसेच इतर समकक्ष पदावर (मुख्य कामगार अधिकारी, नगरसचिव, मुख्य अभियंता, उप आयुक्त अतिक्रमण व समाज विकास अधिकारी इत्यादी.) सुद्धा कामकाज करता येत नाही. या सर्व गोष्टींचा विचार होऊन “कार्यकारी” पदावरती (वर्ग -१) समकक्ष काम करण्याचे आदेश दिले जावेत. असे शेलार यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.
दरम्यान आपली शिक्षा रद्द करावी यासाठी शेलार यांनी  स्थायी समिती आणि अपील उप समिती कडे अपील केले होते. अपील उप समिती च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ठराव करण्यात आला कि याबाबत आयुक्तांनी अभिप्राय द्यावा. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग आयुक्तांच्या माध्यमातून अभिप्राय देणार आहेत. या अभिप्राया बाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
—-