Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागी मल्टीमोडल हब आणि एस.टी. स्टँण्ड उभारण्यासाठी अजित पवार यांनी केल्या सूचना 

Homeadministrative

Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागी मल्टीमोडल हब आणि एस.टी. स्टँण्ड उभारण्यासाठी अजित पवार यांनी केल्या सूचना 

Ganesh Kumar Mule Dec 23, 2024 8:22 PM

DPDC | २६९ कोटी ३४ लक्ष रुपयांच्या स्वराज्य रक्षक संभाजी महाराज स्मारक विकास आराखड्यास मान्यता
Green Hydrogen | Nitin Gadkari | शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करून ग्रीन हायड्रोजन तयार करा | नितीन गडकरी यांचे पुणे महापालिकेला आवाहन
Pune Ganesh Utsav Meeting | गणेश उत्सव नियोजनाबाबत उद्या अजित पवार यांच्यासोबत बैठक

Shivajinagar ST Stand | शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागी मल्टीमोडल हब आणि एस.टी. स्टँण्ड उभारण्यासाठी अजित पवार यांनी केल्या सूचना

 

Ajit Pawar – (The Karbhari News Service) – शिवाजीनगर बस स्थानकाच्या (Shivajinagar Bus Station) जागी मल्टीमोडल हब आणि एस.टी. स्टँण्ड उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री  अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी  सूचना केल्या आहेत. आज  उपमुख्यमंत्री  अजित पवार यांनी एक बैठक घेऊन महामेट्रो (Mahametro) व एस.टी. महामंडळ (MSRTC) यांना त्या जागेवर बस स्थानक व मल्टी मोडल हब उभारण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी स्थानिक आमदार सिध्दार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), एस.टी.महामंडळ व महामेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. (Pune News)

 

महामेट्रोचे शिवाजीनगर भूमिगत स्थानकाच्या बांधकामासाठी शिवाजीनगर एस.टी. बस स्थानक यांचे वाकडेवाडी येथे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले होते. महामेट्रो व एस.टी. महामंडळ यांनी करार केला होता जेणेकरून त्या जागेवर मेट्रोचे स्थानक, एस.टी. बस स्थानक व प्रवाशांच्या सेवेसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टींची (मल्टीमोडल हब) उभारणी केली जाणार होती.  या सर्व सोयी सुविधांचा बृहत आराखडा बनवण्यासाठी एस.टी. महामंडळ व मेट्रो प्रशासक यांच्या तर्फे अनेक शक्यतांचा विचार करण्यात येत होता. या बृहत आराखड्यात एक वाक्यता नसल्यामुळे यात काही दिरंगाई झाली होती.  उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या सुचनेनुसार शिवाजीनगर बस स्थानकाच्या जागेत बांधा वापरा हस्तांतर करा (Bot) यातत्त्वावर मल्टीमोडल हब प्रवासीसेवेसाठी असणाऱ्या सुविधांसाठी बांधकाम करण्यात येणार आहे. हे काम पुर्ण झाल्यानंतर वाकडेवाडी येथील एस.टी. बस स्थानकाचे स्थलांतर मुळ जागी करण्यात येणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0