PMC employees Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड : पाच वर्षाचा करार : 3 हजाराचा कोविड भत्ता देखील मिळणार

HomeपुणेPMC

PMC employees Bonus: महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड : पाच वर्षाचा करार : 3 हजाराचा कोविड भत्ता देखील मिळणार

Ganesh Kumar Mule Oct 06, 2021 12:30 PM

PMC Property Tax | मिळकत कराच्या वसुलीने ओलांडला 1 हजार कोटींचा टप्पा | शनिवार आणि रविवार देखील सुविधा केंद्र सुरु राहणार
Water Closure | शहराच्या काही भागात येत्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार
Health Department | PMC Pune | आरोग्य विभागाकडील CSR ची कामे डॉ विद्या नागमोडे यांच्याकडे 

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड!

: पुढील 5 वर्षाच्या कराराला पक्षनेत्यांच्या बैठकीत मंजुरी

: 3 हजाराचा कोविड भत्ता देखील मिळणार

पुणे: पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीच्या मुहूर्तावर सानुग्रह अनुदान अर्थात बोनस देण्यात येतो. सद्य स्थितीत 5 वर्षाचा करार संपलेला आहे. त्याबाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सन २०२०- २१ ते २०२४-२५ या ५ आर्थिक वर्षाकरीता सानुग्रह अनुदान अधिक जादा रक्कम आदा करणेबाबत संघटनेने  मागणी केलेली होती. त्यानुसार बुधवारच्या पक्षनेत्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यामध्ये हा करार मान्य करण्यात आला. कर्मचाऱ्यांना 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 17 हजाराची ज्यादा रक्कम देण्यात येईल. ही ज्यादा रक्कम प्रति वर्षी 2 हजार रुपयाने वाढवण्यात येईल. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी करता 3 हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत झाला. यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

: 5 वर्षाच्या करारावर मुहर

पुणे महानगरपलिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) तसेच माध्यमिक व तात्रिक
शिक्षण विभागातील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना (शिक्षण सेवकांसह) आणि पुणे महानगरपालिका शिक्षण
मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना (बालवाडी शिक्षिका व सेवकांसह) तसेच महानगरपालिकेच्या
कामास नेमण्यात आलेल्या कंत्राटी व एकवट वेतनावर काम करणाऱ्या सेवकांना, ज्यांचे वेतन महानगरपालिका
निधीतुन अदा करण्यात येते त्या सर्वांना सन २०२०-२१ ते सन २०२४-२५ या पाच आर्थिक वर्षातील सुधारित वेतन संरचनामधील मूळ वेतन + ग्रेड पे + महागाई भत्ता या एकुण रकमेच्या ८.३३ टक्के अधिक जादा रकम प्रत्येक वर्षी अनुक्रमे १७,०००, १९,०००, २१,०००, २३,०००, २५,००० इतकी एकुण रकम सानुग्रह अनुदानापोटी दिवाळीपुर्वी दोन आठवडे मान्यताप्राप्त युनियन बरोबर करार करून देण्यात यावी. अशी मागणी कर्मचारी संघटनेने केली होती. त्यानुसार याबाबत बुधवारी पक्षनेत्यांच्या बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये हा करार मान्य करण्यात आला. कर्मचाऱ्यांना 8.33% अनुदान आणि पहिल्या वर्षी 17 हजाराची ज्यादा रक्कम देण्यात येईल. ही ज्यादा रक्कम प्रति वर्षी 2 हजार रुपयाने वाढवण्यात येईल. शिवाय सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी करता 3 हजाराचा कोविड प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैठकीत झाला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0