PMC TDR Cell | भूसंपादनासाठी टीडीआर सेल निर्माण करा | माजी नगरसेवकांची मागणी

HomeपुणेBreaking News

PMC TDR Cell | भूसंपादनासाठी टीडीआर सेल निर्माण करा | माजी नगरसेवकांची मागणी

Ganesh Kumar Mule Aug 09, 2023 1:03 PM

Pune PMC News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा समूह अपघात विमा! | महापालिका आयुक्तांचा निर्णय
Pune Water cut on Thursday | पुणे शहरात काही भागात  गुरुवारी पाणीपुरवठा राहणार बंद
PMC Accident Insurance | समूह अपघात विमा योजना | अपघाताची माहिती देण्याचे कामगार विभागाचे कर्मचाऱ्यांना आदेश

PMC TDR Cell | भूसंपादनासाठी टीडीआर सेल निर्माण करा | माजी नगरसेवकांची मागणी

PMC TDR Cell | रस्ते व इतर प्रकल्पांसाठी जागा ताब्यात घेण्यासाठी नगर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआर ( हस्तांतरीय विकास हक्क) सेल निर्माण करून सेलचे काम सुटसुटीत, पारदर्शी आणि कटकटीविना करावे, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. (PMC TDR Cell)
टीडीआरची प्रक्रिया वेगाने होण्यासाठी महापालिका आयुक्तांनी नियमावलीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी महापालिका आयुक्तांचे अभिनंदन केले आहे. टीडीआरची फाईल दाखल केल्यानंतर त्याची एक प्रत हार्ड कॉपी व तीन अॅडव्हान्स कॉपी दाखल करावी लागते. त्यानंतर फाईलचा प्रवास विधी विभाग, जाहीर नोटीस, टायटल व्हेरिफिकेशन, सर्च रिपोर्ट, लँड आणि इस्टेट, साईट व्हिजिट व त्यांचे अभिप्राय असा साधारण तीन महिने सुरू राहतो. (Pune Municipal Corporation)
एखादा घरमालक एखादी जागा विकत घेताना त्या जागेचे टायटल बघून जागेचा ताबा मोजणी या सगळ्या बाबी बघून व्यवहार पूर्ण करतो आणि आपल्या नावावर सदरची जागा करून घेतो. त्यामुळे एखाद्या प्रॉपर्टीचे टायटल जर क्लीअर करायचे  असेल, तर या सगळ्या प्रक्रियेला उशीर होण्याची आवश्यकता नाही. महापालिकेमध्ये आजच्या घडीला ७० ते ८० फाईल या विषयासाठी प्रलंबित आहेत. महापालिकेच्या ताब्यामध्ये जर एवढ्या मौल्यवान जागा येत असतील, तर एक अधीक्षक अभियंता दर्जाचा अधिकारी नेमून त्याच्या शहर नगर अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली टीडीआर सेलच्या माध्यमातून काम करावे. अशी मागणी केसकर, कुलकर्णी व बधे यांनी केली आहे. (PMC Pune News)

—-
News Title | PMC TDR Cell | Generate TDR Cell for Land Acquisition | Demand of former corporators