Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

HomeBreaking Newsपुणे

Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Ganesh Kumar Mule Jul 25, 2023 2:10 PM

MNS Agitation | PMC Pune | पिण्याच्या पाण्याच्या लाईन मधून सांडपाणी मिश्रित पाणी | मनसेने केला आरोप आणि पुणे महापालिकेवर काढला मोर्चा 
Marathi Board | MNS Pune | दुकाने व आस्थापनेवरील पाटया मराठीत करा | मनसेचा इशारा 
MNS Pune | PMC Road Work | रस्त्यांच्या चुकीच्या कामामुळे पावसाळ्यात घरात आणि दुकानात पाणी जाण्याची शक्यता! 

Pune Water Cut | MNS Pune | पाणी कपात रद्द न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

Pune Water Cut | MNS Pune |  पुणे शहरात मे महिन्यापासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसाने धरणात पाणी साठत आहे. त्यामुळे आता पाणीकपात रद्द करावी. अशी मागणी मनसेच्या वतीने महापालिका आयुक्तांना केली आहे. पाणीकपात रद्द न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. (Pune Water Cut | MNS Pune)
याबाबत मनसेकडून महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनानुसार पुणे शहरातील पाणी कपात मागे घेण्याचा निर्णयाचा  आढावा ऑगस्ट महिन्यात घेणार असा निर्णय पुणे महानगर पालिकेचे आयुक्त  विक्रम  कुमार यांनी जाहीर केला. पुणे शहरात पुणे महानगरपालिकेने लादलेली पाणी कपात पाणी कमी दाबाने येणे अशा समस्येमुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेवर हांडा मोर्चा काढण्यात आलेला होता. (Pune Rain)
आजही पाणी कपाती मुळे पुणेकरांना हाल सोसावे लागत आहे. खडकवासला धरण साखळीत काल रात्री पर्यंत ६०% पाणी साठा जमा झाला आहे. तर एकटे खडकवासला धरण ८२% भरले आहे.  पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याने खडकवासला धरण साखळी  पूर्ण क्षमतेने भरणार आहे पाटबंधारे खाते नदीपात्रातून विसर्ग करण्याच्या दृष्टीने काम करीत असून येत्या २४ ते ४८ तासात नदीपात्रातून पाणी सोडण्याची शक्यता आहे. तश्या पद्धतीचे इशारे पाटबंधारे खात्याने दिले आहेत. असे असताना पुणे शहरात पाणी कपात का आणि त्या संधर्भात तातडीने निर्णय घेण्याची गरज असताना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचा घाट का घातला जात आहे ?पुणे शहरातील पाणी कपात तातडीने रद्द करून यावर त्वरित निर्णय घेऊन पुणेकरांना दररोज सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. असे निवेदनात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation)
——
News Title | Pune Water Cut | MNS Pune | MNS warns of agitation if water cut is not cancelled