PMC Employees Time Bound Promotion | आश्वासित प्रगती योजना स्थगिती वरून  महापालिका कमर्चारी संघटना आक्रमक    | कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो? 

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Time Bound Promotion | आश्वासित प्रगती योजना स्थगिती वरून  महापालिका कमर्चारी संघटना आक्रमक  | कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो? 

Ganesh Kumar Mule Jul 15, 2023 2:12 PM

PMC Engineering Cadre Promotion | महापालिकेच्या JE ना आता 25% ऐवजी फक्त 15% पदोन्नती; त्यासाठीही परीक्षा द्यावी लागणार | 85% सरळसेवा भरती
PMC Security Officer Promotion | सुरक्षा अधिकारी पदोन्नती : फौजदारी गुन्ह्याबाबत पदोन्नती समितीच निर्णय घेणार! | महापालिका प्रशासनाचे स्पष्टीकरण
PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेतील रखडलेल्या पदोन्नती वरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने आयुक्तांना फटकारले 

PMC Employees Time Bound Promotion | आश्वासित प्रगती योजना स्थगिती वरून  महापालिका कमर्चारी संघटना आक्रमक

| कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो?

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या आश्वासित प्रगती योजनेचा प्रस्ताव (Time Bound Promotion Proposal) पुन्हा एकदा लटकला आहे. याबाबतची प्रक्रिया स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले आहेत. याच्या अंमलबजावणी बाबत राज्य सरकार कडून स्पष्टीकरण घेतले जाणार आहे. यामुळे कर्मचारी संघटना मात्र चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय सरकारकडे का पाठवला जातो, असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच याबाबत कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला नाही तर सर्व संघटना प्रशासन विरोधात आंदोलन करणार आहेत. (PMC Employees Time Bound Promotion)
पुणे महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांना लागू केलेल्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी व सुधारित वेतन संरचना यानुसार तीन लाभांची सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजना (१०/२०/३० वर्षे) लागू करण्याबाबत कार्यालयीन आदेश प्रसृत करण्यात आलेला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरु झालेली आहे. या  प्रकरणी सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागवावे, तोपर्यंत दाखल प्रस्ताव व यापूर्वी मान्य केलेले प्रस्ताव देखील पुढील आदेश होईपर्यंत स्थगित करावेत, असे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांनी दिलेले आहेत. (PMC General Administration Department) त्यानुषंगाने सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे अंमलबजावणीबाबत राज्य शासनाकडून स्पष्टीकरण मागविणेची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागाकडून करण्यात येईल. तरी, सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे सर्व प्रस्ताव पुढील आदेश होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावेत. असे आदेश प्रशासनकडून जारी करण्यात आले आहेतमी. यामुळे कर्मचारी मात्र हवालदिल झाले आहेत. यामुळेच कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. (7th Pay Commission Update)
– —–
अतिरिक्त आयुक्तांनी आश्वासित प्रगती योजनेला दिलेली स्थगिती ही निषेधार्ह आहे. मुंबई  तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी अंमलबजावणी केलेली आहे याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. त्या आधारे आम्ही आयुक्त, अतिरिक्त महापालिका आयुक्त यांना कळवले असून ताबडतोब आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करण्यात सांगितलेले आहे.  अंमलबजावणी झाली नाही तर सर्व सहयोगी  संघटनांची एकत्रित बैठक घेऊन पुढील निर्णय करूया.
उदय भट, अध्यक्ष, पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)
महापालिका प्रशासनकडून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक विषय राज्य सरकारकडे पाठवला जातो. म्हणजेच प्रशासनाला कमर्चाऱ्यांविषयी काही घेणे देणे नाही. आश्वासित प्रगती योजनेचा विषय सरकारकडे पाठवण्याची कुठलीही आवश्यकता नव्हती.  याचा सगळ्यात जास्त त्रास सेवानिवृत्त सेवकांना होणार आहे. त्यांची पेन्शन प्रकरणे प्रलंबित राहणार आहेत. 
आशिष चव्हाण, सरचिटणीस, पीएमसी एम्प्लॉईज युनियन 
——–
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Municipal employees union aggressive over suspension of Assured Progress Scheme