PMC Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतेय समूह अपघात विमा योजना!

HomeBreaking Newsपुणे

PMC Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतेय समूह अपघात विमा योजना!

Ganesh Kumar Mule Jun 24, 2023 1:25 PM

Pune Water cut | नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Pune | Water Closure | बुधवार आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा बंद 
Pune EV Charging Station | PMC | पुणे महापालिकेच्या मालकीच्या 20 जागांवर चार्जिंग स्टेशन उभारण्यास प्राधान्य!

PMC Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतेय समूह अपघात विमा योजना!

| आतापर्यंत 19 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना फायदा

PMC Accident Insurance | (Author – Ganesh Mule) पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC Group Accident Insurance Scheme) चालवली जाते. महापालिकेचे अनेक कर्मचारी अपघातांना बळी पडून कायमचे अपंग होतात.  तसेच अनेक लोकांचा मृत्यू होतो.  त्यामुळे अपघातात बळी पडणाऱ्या अशा महापालिका कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका विमा संरक्षण देत आहे.  महापालिकेच्या सर्व कामगारांना आता सुमारे 10 लाखांचा विमा उतरवण्यात येत आहे.  त्या बदल्यात त्यांना त्यांच्या पगारातून केवळ 136 रुपये दरमहा द्यावे लागतात.  महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे.  आतापर्यंत सुमारे 19 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना महापालिकेने 1 कोटी 74 लाख रुपये दिले आहेत. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी (Chief Labour Officer Arun Khilari) यांनी दिली. (PMC Accident Insurance)

 – सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना

 महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.  यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.  या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात.  आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता.  परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे.  कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात.  यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत.  अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे.  अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना 10 लाखांचा विमा मिळत आहे.  जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा 100 टक्के लाभ दिला जातो.  कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे.  पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो.  यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ १३६ रुपये द्यावे लागतात. (Pune Municipal Corporation News)

2022-23 मध्ये एकही कर्मचाऱ्याला लाभ नाही

मुख्य कामगार अधिकारी अरुण खिलारी यांच्या माहितीनुसार आतापर्यंत 18 कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना या योजनेचा फायदा झाला आहे. मात्र 2022-23 सालात एक ही कर्मचाऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नाही. एक कर्मचाऱ्याचा प्रस्ताव आला होता. मात्र कागदपत्रे अपुरी असल्याने तो प्रस्ताव फेटाळला गेला. 2016-17 साली 1 कर्मचारी, 2017-18 ला 0, 2018-19 ला 7, 2019-20 ला 3, 2020-21 ला 5, 2021-22 ला 3 तर 2022-23 ला 0 कर्मचाऱ्यांना असे एकूण 19 कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाना याचा लाभ मिळाला आहे. (PMC Pune News)

– चालू वर्षी योजनेला अजून मंजुरी नाही

दरम्यान 2023-24 सालातील अपघात विमा योजनेला अजूनही प्रशासनाकडून मंजूरी मिळालेली नाही. कामगार विभागाकडून याबाबतचा प्रस्ताव आधीच पाठवण्यात आलेला आहे. मात्र हा प्रस्ताव प्रलंबित आहे. लवकरच याला मंजूरी मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. (PMC Pune Employees)
News Title | PMC Accident Insurance | Group accident insurance scheme is beneficial for Pune municipal employees!