Pune Municipal Corporation | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला हरताळ
| मनपा भवनात पुन्हा समूहाने फिरताना दिसताहेत महापालिका कर्मचारी
Pune Municipal Corporation | महापालिकेच्या (PMC Pune) कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी (PMC Pune Employees) हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना तसेचचर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली होती. ही बाब महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी (PMC Additional Commissioner) गंभीरपणे घेतली होती आणि नियमावली ठरवून दिली होती. तसेच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांच्या आदेशाला हरताळ फासत महापालिका कर्मचारी पुन्हा समूहाने फिरताना दिसू लागले आहेत. यावर प्रशासन काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. (Pune Municipal Corporation)
| काय होते अतिरिक्त आयुक्तांचे आदेश?
पुणे महानगरपालिका प्रशासकीय कार्यालये व विभाग यांचेसाठी आदेशान्वये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व अधिकारी / कर्मचारी यांना कार्यआदेशनुसार कामकाजाची वेळ निश्चित केलेली असून, सर्व अधिकारी / कर्मचारी यांनी विहित केलेली कार्यालयीन कामकाजाची वेळ पाळणे आवश्यक आहे. आदेशाप्रमाणे दुपारी ०२.०० ते ०२.३० ही आर्धा तास भोजनाची सुट्टी नेमून दिलेली आहे. पुणे महानगरपालिका सेवा विनियमामधील ‘नगरपालिका कर्मचाऱ्यांचे वर्तणूक नियम’ यातील नियम क्र. २८ आणि २९ नुसार प्रत्येक महानगरपालिका कर्मचाऱ्याने कार्यालयात वक्तशीरपणे हजर राहाणे, नेमून दिलेले काम कार्यालयीन वेळेमध्ये इमानाने व प्रामाणिकपणे करणे, सहकाऱ्यांबरोबर अनावश्यक बडबड न करणे, गटागटाने चर्चा न करणे असे वर्तन सर्व कर्मचाऱ्यांकडून होणे अभिप्रेत व आवश्यक आहे. (PMC Pune Circular)
कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. त्यानुसार सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे आवश्यक आहे. याबाबत यापूर्वी वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. कार्यालयीन आदेशाप्रमाणे भोजनाची दुपारी २.३० ची वेळ संपल्यानंतर महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये तसेच क्षेत्रिय स्तरावरील कार्यालयांमध्ये काही कर्मचारी हे आपापल्या जागेवर कामासाठी उपलब्ध न होता समुहाने फिरताना / चर्चा करताना तसेच कार्यालयीन वेळ संपण्यापूर्वीच कार्यालयातून निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहेत. ही बाब नागरिकांकडून तसेच विविध समाज माध्यमांमधून देखील निदर्शनास आणलेली आहे. कर्मचाऱ्यांची अशी वर्तणूक ही प्रशासकीय दृष्ट्या योग्य नाही. याबाबत कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्तांनी दिला होता. मात्र हा आदेश डावलत कर्मचारी मनमानी करताना दिसून येत आहेत. 2:30 वाजून गेले तरी कर्मचारी भवनात समूहाने फिरताना दिसत आहेत. काही कर्मचारी नियमाचे पालन करतात तर काही मात्र हरताळ फासताना दिसून येतात. यामुळे आता प्रशासन अशा लोकांवर काय कारवाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (PMC Pune News)
——-
News Title | Pune Municipal Corporation | Pune Municipal employees protested the order of Additional Commissioner | Municipal employees are again seen moving in groups in the municipal building