Cloth vending Machine | पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी मिळवा कापडी पिशव्या | महापालिकेस ८ मशीन प्राप्त

HomeBreaking Newsपुणे

Cloth vending Machine | पुण्यात वर्दळीच्या ठिकाणी मिळवा कापडी पिशव्या | महापालिकेस ८ मशीन प्राप्त

Ganesh Kumar Mule Apr 25, 2023 12:08 PM

PMPML in rural areas | ग्रामीण भागातील पीएमपीएमएलची बससेवा पुन्हा होणार पूर्ववत | सुप्रिया सुळे यांनी देखील केली होती मागणी
Pramod Nana Bhangire | चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेची बाजू घेणाऱ्या विरोधकांचा निषेध करावा तेवढा कमी- प्रमोद नाना भानगिरे
Adhar No | Voter list | मतदार यादीतील नोंदीचे आधार क्रमांकाच्या आधारे प्रमाणीकरण

प्रायोगिक तत्वावर 1 महिना बसवल्या जाणार कापडी पिशव्यांची मशीन

| झेन्सार-आर. पी. जी. फौंडेशन कडून मनपास 8 मशीन प्राप्त

प्लास्टिक निर्मूलनासाठी महापालिकेकडून गंभीरपणे पावले उचलली असून त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता महापालिका पुणेकरांना कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनचा वापर करून नागरिक कॉइन टाकून पिशवी सहजासहजी उपलब्ध करून घेऊ शकतात. लवकरच ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यानुसार  झेन्सार-आर. पी. जी. फौंडेशन तर्फे पुणे महानगरपालिकेस कापडी पिशव्या मशीन व प्लास्टिक डिस्पोजल मशीनचे वाटप करण्यात आले आहे. (pune municipal corporation)

झेन्सार- आर.पी.जी. फाउंडेशन तर्फे २५/०४  रोजी एकूण ८ कापडी पिशव्या मशीन व १ प्लास्टिक डिस्पोजल मशीन पुणे महानगरपालिकेस सुपूर्त करण्यात आल्या. आर.पी.जी.फाउंडेशन हे बॉम्बे पब्लिक ट्रस्ट कायदा, १९५० अंतर्गत नोंदणीकृत सार्वजनिक धर्मादाय ट्रस्ट आहे. यामध्ये सियाट लिमिटेड, झेन्सार टेक्नोलॉजीज लिमिटेड, केईसी इंटरनॅशनल लिमिटेड रेकम आर. पी. जी. प्रायव्हेट लिमिटेड, आर. पी. जी. लाईफ सायन्सेस लिमिटेड, स्पेन्सर्स आणि कंपनी लिमिटेड, अशा विविध संस्थांचा समावेश आहे. या मशीन देण्याचा मुख्य हेतू म्हणजे कापडी पिशव्यांमुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन प्लास्टिकचे प्रदूषण कमी करणे या सोबतच कापडी पिशव्या बनवत असताना गरजू महिलांना रोजगारनिर्मिती उपलब्ध करून देणे असा असणार आहे. (cloth vending machine)

या मशीनचे उद्घाटन प्रसंगी  आमदार श्रीमती माधुरीताई मिसाळ,   विक्रम कुमार, महापालिका आयुक्त, डॉ. कुणाल खेमनार, मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (इ),   प्रशांत वाघमारे, शहर अभियंता,  शुभा कुमार, VP, Chief Risk, Sustainability and Quality Officers, Zensar Company व श्रीमती भानुश्री शर्मा, Senior Manager, Zensar Company,   अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक, डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, योगेश हेनरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी, श्रीमती स्वाती देशमुख, झेन्सार कंपनी इ. अधिकारी उपस्थित होते.
या कापडी पिशव्या मशीन्स शहरातील विविध भागात, वर्दळीच्या ठिकाणी, मार्केट परिसरात प्रायोगिक तत्वावर बसविण्यात येतील. १ महिना कालावधीनंतर या मशीन्सची उपयोगिता तपासून यानंतर शहरातील इतर मार्केट परिसर व वर्दळीच्या ठिकाणी सदर मशीन्स उपलब्ध करून घेऊन शहरातील विविध अपंग कल्याणकारी, दिव्यांग, तृतीयपंथी किंवा इतर
बचत गटांना चालविण्यात देण्यात येतील असे यावेळी महापालिका आयुक्त यांनी सांगितले. (pmc pune)