Water closure | धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

HomeपुणेBreaking News

Water closure | धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

Ganesh Kumar Mule Apr 13, 2023 1:40 PM

Whats App Chat Bot | पुणे महापालिकेच्या ८० प्रकारच्या सेवा whats App वर | पुणे महापालिकेचा हा whats App नंबर तुमच्या कामाचा! 
Vadgaonsheri | वडगाव शेरीतील प्रश्नांबाबत महापालिका ऍक्शन मोडवर
PMC Pune Transgender Employees |  Pune Municipal Corporation will hire 25 Transgender

धायरी, हिंगणे परिसराचा मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार

पुणे | मंगळवार १८/०४/२०२३ रोजी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथील मुख्य पाण्याच्या

लाईनचे तातडीचे व अत्यावश्यक स्वरूपाचे दुरुस्तीचे काम घेण्यात येणार आहे. या दिवशी हिंगणे, सनसिटी रोड, माणिकबाग, वडगाव, धायरी या परीसरामधील पाणीपुरवठा बंद राहणार आहे व बुधवार
१९/०४/२०२३ रोजी सदर भागामध्ये सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :
– हिंगणे, विश्रांतीनगर, सनसिटी रोड, आनंदनगर, माणिकबाग, वडगाव,धायरी, राजयोग सोसायटी, परांजपे परिसर इ. परिसर.