Domestic Workers | घरेलू कामगारांना विशेष सहाय्य मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन

HomeपुणेBreaking News

Domestic Workers | घरेलू कामगारांना विशेष सहाय्य मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Mar 10, 2023 12:17 PM

G 20 Conference | 16 आणि 17 जानेवारीला जी20 परिषदेच्या पायाभूत सुविधा कार्यगटाची बैठक पुण्यामध्ये
Raj’s interaction with students | राज ठाकरेंच्या सभेला उपस्थित अंध विद्यार्थ्यांसोबत राज यांचा संवाद! | काय प्रश्न विचारला राज ठाकरेंनी? 
PMC Recruitment | पुणे महापालिकेत 320 पदांसाठी भरती | 10 मार्चपर्यंत निघणार जाहिरात

घरेलू कामगारांना विशेष सहाय्य मिळण्याकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे | घरेलू कामगार कल्याण मंडळामध्ये ३१ डिसेंबरअखेर नोंदणी असलेल्या व ५५ ते ६० वयोमर्यादा पूर्ण केलेल्या घरेलू कामगारांनी सन्मानधन योजनेअंतर्गत १० हजार रुपयांचे विशेष सहाय्य मिळण्याकरिता ३१ मार्च पूर्वी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्ह्याच्या सहायक कामगार आयुक्तांनी केले आहे. (Domestic workers)

घरेलु कामगारांनी विहित नमुन्यातील प्रपत्र ‘अ’ सह बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत, ३१ डिसेंबर २०२२ पर्यंतची मागील दोन वर्षाची नोंदणी/नूतनीकरण केलेल्या पावतीची आणि आधार कार्डची छायांकित प्रत आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. (Domestic workers)

घरेलू कामगारांनी योजनेच्या माहितीसाठी, प्रपत्र अ च्या नमुन्यासाठी, तसेच अर्ज सादर करण्यासाठी कामगार उप आयुक्त, यांचे कार्यालय, बंगला नं.- ५, पुणे-मुंबई रस्ता, शिवाजीनगर, पुणे- ४११ ००५ येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
०००