Water Reservation | पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करा  | पाटबंधारे विभागाचे महापालिकेला आदेश 

HomeपुणेBreaking News

Water Reservation | पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करा | पाटबंधारे विभागाचे महापालिकेला आदेश 

Ganesh Kumar Mule Jul 15, 2022 1:29 PM

MP Vandana Chavan | नदीकाठ सुधार प्रकल्पा वरून पुणे मनपाला जलसंपदा विभागाचा निर्वाणीचा इशारा 
Irrigation : Water Cut for Pune : पोलीस बंदोबस्तात पाटबंधारे विभाग उद्या पुण्याचे पाणी करणार कमी! : महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला निषेध
Water Resources Department Vs PMC : पाणीपट्टी थकीत ठेवल्याने जलसंपदा विभागाची महापालिकेवर कारवाई : नेमकं काय आहे प्रकरण…

पाणी आरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करा

| पाटबंधारे विभागाचे महापालिकेला आदेश

पुणे | पुणे म.न.पा.चे पाणी आरक्षण जलसंपदा विभागाच्या
विविध प्रकल्पांमधून मंजूर असल्याने म.ज.नि.प्रा.चे  मापदंडाप्रमाणे पाणीवापर आहे किंवा नाही व त्यानुसार आकारणी करण्यासाठी  पुणे महानगरपालिकेने सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा. तसेच दरानुसार विविध प्रकल्पातून केलेला पाणीवापर एकत्रित करून जास्तीच्या पाणीवापरावर अनुज्ञेय दराने पाणीपट्टी पुणे महानगरपालिकेस भरणा करणे अनिवार्य राहील. असे आदेश पाटबंधारे विभागाने महापालिकेस दिले आहेत.

पाटबंधारे पुणे मंडळांतर्गत बिगरसिंचन पाणीवापर ग्राहकांच्याबाबत काही ग्राहकांनी जसे कि पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोका कोला कंपनी, पिरंगुट इ. ग्राहकांनी त्यांच्या पाणीमागणीच्या अनुषंगाने विविध प्रकल्पांतून पाणी आरक्षित केले आहे. पुणे म.न.पा.स देखील जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पातून पाणी आरक्षणास मंजूरी आहे. यामध्ये खडकवासला, पवना, भामा आसखेड चा समावेश आहे.

हे प्रकल्प पुणे मंडळांतर्गत विविध क्षेत्रीय विभागांकडे असल्यामुळे प्रकल्पनिहाय पाणीवापरासाठी विभागनिहाय वेगवेगळे बिगरसिंचन करारनामे, सिंचन पुनर्स्थापना रक्कम व दोन महिन्याची आगाऊ पाणीपट्टी
अनामत रक्कम भरून संबंधित विभागाकडे करारनामे संबंधित संस्थेस करावे लागतात. म.ज.नि.प्रा. आदेश दि. २९.०३.२०२२ मधील निर्देशानुसार बिगरसिंचन ग्राहकांच्या पाणीवापरानुसार आकारणी दर केले आहेत.

बिगरसिंचन पाणीवापरकर्ता/ग्राहक एकच असल्याने जरी विविध धरणातून पाणी आरक्षण मंजूर असले तरी एकत्रित पाणीवापरावर गणना करून वरीलप्रमाणे दरानुसार पाणीपट्टी आकारणी करणे आवश्यक आहे. यास्तव  वस्तुस्थिती विचारात घेता पुणे म.न.पा.चे पाणी आरक्षण जलसंपदा विभागाच्य. विविध प्रकल्पांमधून मंजूर असल्याने म.ज.नि.प्रा.चे वरील मापदंडाप्रमाणे पाणीवापर आहे किंवा नाही व त्यानुसार आकारणी करण्यासाठी संबंधित अधीक्षक अभियंता यांचेकडे पुणे महानगरपालिकेने सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा व वर नमूद दरानुसार विविध प्रकल्पातून केलेला पाणीवापर एकत्रित करून जास्तीच्या पाणीवापरावर अनुज्ञेय दराने पाणीपट्टी पुणे महानगरपालिकेस भरणा करणे अनिवार्य राहील. त्यानुषंगाने पुणे म.न.पा. ने अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ, पुणे यांचेकडे सर्व मंजूर पाणीआरक्षणाच्या अनुषंगाने एकत्रित करारनामा करावा. असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.