PMPML | रिक्षा आंदोलनाचा पीएमपीला फायदा | ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

HomeBreaking Newsपुणे

PMPML | रिक्षा आंदोलनाचा पीएमपीला फायदा | ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

Ganesh Kumar Mule Nov 30, 2022 2:23 AM

Old pension | जुनी पेन्शन योजना राज्यात लागू होण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत | दोन मतप्रवाह
PM Modi Pune Tour | पंतप्रधान यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी वाहतूकीत बदल
Phone Lost | फोन चोरीला गेला आहे? | बँक तपशील आणि मोबाईल वॉलेटबाबत टेन्शन?  | आता काय करायचे ते जाणून घ्या

रिक्षा आंदोलनाचा पीएमपीला फायदा | ‘पीएमपीएमएल’ने दैनंदिन उत्पन्नात ओलांडला २ कोटींचा टप्पा

| पीएमपीएमएल स्थापनेनंतर प्रथमच तिकीट विक्रीतून मिळाले उच्चांकी उत्पन्न

२८ नोव्हेंबर  रोजी रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने पीएमपीएमएलने दैनंदिन उत्पन्नात २
कोटी रूपयांचा टप्पा पार केला असून पीएमपीएमएलला प्रथमच पीएमपीएमएल स्थापनेपासून १५ लाख ४७ हजार ९४६ प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर विश्वास दाखवून बससेवेचा वापर केल्याने निव्वळ तिकीट विक्रीतून १,९२,०८,९६८ रु. एवढे उच्चांकी उत्पन्न मिळाले. पास विक्रीतून १२,६२,७५५ रु. एवढे उत्पन्न मिळाले असून असे एकूण २ कोटी ४ लाख ७८ हजार ७२३ रूपये इतक्या विक्रमी उत्पन्नाचा टप्पा पार केला आहे. यापूर्वी दि. १४ नोव्हेंबर २०२२ व दि. ४ जानेवारी २०१६ रोजी २ कोटी रूपयांचे दैनंदिन उत्पन्न पार करण्यात पीएमपीएमएल ला यश आले होते. अशी माहिती पीएमपी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

२८ नोव्हेंबर २०२२ रोजी रिक्षा संघटनांनी बेमुदत संप पुकारल्याने पीएमपीएमएलने दैनदिन संचलनात
असलेल्या बसेस व्यतिरिक्त शंभर जादा बसेस पुणे – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी १७४० बसेस संचलनात आणल्या होत्या. तसेच पुणे – पिंपरी चिंचवड शहर हद्दीबाहेरील बसेस कमी करून दोन्ही शहरात संचलनात ठेवल्या होत्या. वाहतूक कोंडीचा विचार करता पीएमपीएमएल च्या ताफ्यात असणाऱ्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा वापर शहरवासियांनी व शहरात येणाऱ्या प्रवाशांनी वाढविला आहे. दि. २८ नोव्हेंबर २०२२ रोजी १५,४७,९४६ प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेचा वापर केल्याने दैनंदिन उत्पन्नात २ कोटी रूपयांचा टप्पा पार करण्यात यश आले आहे. यामुळे पुणे व पिंपरी चिंचवड शहरांची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली पीएमपीएमएलची बससेवा ही किफायतशीर, सुरक्षित व विश्वासार्ह असल्याचे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मजूर, कामगार, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला प्रवाशांनी पीएमपीएमएलच्या बससेवेवर नेहमीच विश्वास
दाखवला आहे. त्याचबरोबर शहरातील शाळा व कॉलेज पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी संख्येत देखील लक्षणीय वाढ झाली आहे. दैनंदिन प्रवाशी संख्या व दैनंदिन उत्पन्नामध्ये झालेली वाढ ही प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या बससेवेवर दाखविलेला विश्वास आहे. प्रवाशांनी पीएमपीएमएल च्या पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रीक बस व सीएनजी बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.