समाविष्ट 23 गावांतील 626 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले जाणार
: महापालिका आयुक्तांचे आदेश
पुणे : राज्य सरकारच्या(State Gov) निर्देशानुसार महापालिका(pune corporation) हद्दीत 23 गावाचा समावेश करण्यात आला आहे. गावे समाविष्ट करताना गावातील कर्मचारी देखील विविध क्षेत्रीय कार्यालयात(ward offices) कामावर रुजू करून घेण्यात आले होते. मात्र त्यातील सुमारे 626 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने नियमबाह्य ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी(PMC Commissioner) प्रशासनाला दिले आहेत.
: जिल्हा परिषदेने ठरवले नियमबाह्य
महापालिका हद्दीत एकूण 34 गावांचा समावेश झाला आहे. त्यातील 23 गावे नुकतीच महापालिका हद्दीत आली आहेत. मात्र ही गावे महापालिका हद्दीत येण्या अगोदर काही दिवसापूर्वी ग्रामपंचायत मध्ये कर्मचाऱ्यांची नियमबाह्य भरती करण्यात आली होती. हे सर्व कर्मचारी महापालिका सेवेत घेण्यात आले होते. त्यांना विविध क्षेत्रीय कार्यालयात ररुजू करून घेण्यात आले होते. मात्र याची चौकशी जिल्हा परिषदेकडून करण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे 626 कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेने नियमबाह्य ठरवले आहे. त्यामुळे त्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत.
ग्रामपंचायत कमी केले जाणारे कर्मचारी
सुस 40
बावधन बुद्रुक. 55
किरकटवाडी 5
कोंढवे-धावडे 64
न्यू कोपरे 40
नांदेड 37
खडकवासला 56
नऱ्हे 85
होळकरवाडी 37
औताडे हांडेवाडी 28
वडाचीवाडी 14
नांदोशी सणसनगर 19
मांगडेवाडी 36
भिलारेवाडी 15
गुजर निंबाळकरवाडी 34
जांभूळवाडी कोळेवाडी 45
वाघोली 6
COMMENTS