Rani Bhosale | पीएमपीच्या बसमध्ये देखील महिलांना 50% सवलत द्या   | माजी महिला बाल कल्याण अध्यक्ष राणी भोसले यांची मागणी

HomeपुणेBreaking News

Rani Bhosale | पीएमपीच्या बसमध्ये देखील महिलांना 50% सवलत द्या | माजी महिला बाल कल्याण अध्यक्ष राणी भोसले यांची मागणी

Ganesh Kumar Mule Mar 20, 2023 8:28 AM

Ganesh Idol Immersion | गणेशमुर्त्यांचे पुर्नविसर्जन वाघोली येथील खाणीमध्ये | महापालिकेचे नियोजन तयार! 
PMPML Pass | पीएमपीएमएल कडून “फिरते पास केंद्र” उपक्रमाची सुरुवात!
Pune Airport Runway | पुणे विमानतळ धावपट्टी विस्तारीकरणाचे काम आता ‘फास्टट्रॅक’वर : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

पीएमपीच्या बसमध्ये देखील महिलांना 50% सवलत द्या

| माजी महिला बाल कल्याण अध्यक्ष राणी भोसले यांची मागणी

पुणे | राज्य सरकारने महिला सम्मान योजना अंतर्गत राज्यातील सर्व महिलांना एसटीच्या तिकिटमध्ये 50% सवलत दिली आहे. त्याच धर्तीवर PMPML मधून प्रवास करणाऱ्या महिलांना देखील 50% सवलत द्यावी. अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका तथा माजी महिला बाल कल्याण समितीच्या अध्यक्ष राणी भोसले यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारच्या वतीने महिला सम्मान योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्या अंतर्गत महिलांना वेगवेगळ्या सुविधा देण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून एसटीच्या प्रवासात तिकिटात 50% सवलत देण्यात आली आहे. पुणे शहरात पीएमपी ला पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी म्हटले जाते. यामधून खूप महिला प्रवास करत असतात. महिलांसाठी विशेष बस देखील ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महिन्यातून एकदा मोफत प्रवासाची सुविधा महिलांना दिली जाते. शहरातील महिला प्रवाशाची संख्या पाहता आणि त्यांना सुविधा देण्याच्या दृष्टीने एसटी प्रमाणेच पीएमपी मध्ये देखील सर्व महिला 50% सवलत देण्याची मागणी राणी भोसले यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त आणि पीएमपी प्रशासन मिळून काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.