34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत अजून 9 सदस्यांचा समावेश  | जाणून घ्या नवीन 9 सदस्यांची यादी

HomeBreaking Newsपुणे

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत अजून 9 सदस्यांचा समावेश | जाणून घ्या नवीन 9 सदस्यांची यादी

गणेश मुळे Mar 16, 2024 8:16 AM

Vijaystambh | Perne Fata | ऐतिहासिक विजयस्तंभास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
Supriya Sule | Ajit Pawar | मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषण करू दिले नाही 
Pune Traffic | मुंबईच्या धर्तीवर पुणे वाहतूक शाखेसाठी सह-पोलीस आयुक्त नेमावेत

34 Villages Committee | समाविष्ट 34 गावांसाठीच्या लोकप्रतिनिधी समितीत अजून 9 सदस्यांचा समावेश  | जाणून घ्या नवीन 9 सदस्यांची यादी

34 Villages Committee – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत ( Pune Municipal Corporation (PMC) समाविष्ट झालेल्या ३४ गावांमध्ये मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे. हा प्रश्न मागील काही दिवसांपासून गंभीर होत चालला आहे.  आता यावर तोडगा काढण्यात आला असून यासाठी विभागीय आयुक्तांच्या (Pune Divisional Commissioner) अध्यक्षतेखाली १८ लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दरम्यान याबाबत काही सदस्यांनी आम्हांला डावलले गेल्याची तक्रार अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार या यादीत अजून 9 सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून नुकतेच याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे महापालिका (PMC Pune) हद्दीत 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पुणे शहराच्या हद्दीत वाढ झाली आहे. तसेच या गावांना महापालिकेचे सर्व नियम लागू झाले आहेत. मिळकत कराची (PMC Pune property Tax) वसुली देखील सुरु झाली आहे. मात्र या गावांमध्ये मूलभूत सुविधाचा अभाव आहे.  यावर  नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) देखील चर्चा झाली होती.  मंत्री उदय सामंत यांनी ह्या विषयाबाबत दखल घेतली होती. शासनाकडून 34 गावातील लोकप्रतिनिधी मिळून विभागीय आयुक्त व पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून समिती ताबडतोब नेमली जाईल व त्या समितीमार्फत निधी देऊन कामे होतील असे अधिवेशनात सांगितले होते. त्यानुसार 18 लोकांची समिती स्थापन केली होती. (PMC Pune village news)

मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे आम्हांला डावलले गेल्याची तक्रार केली होती. त्यानुसार पवार यांनी यात लक्ष घालून समितीत अजून 9 लोकांचा समावेश केला आहे. 

पुणे महानगरपालिका हद्दीतील नव्याने समाविष्ट ३४ गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली समितीमध्ये ०९ लोकप्रतिनिधीची सदस्यपदी नियुक्ती.

 1. पांडुरंग एकनाथ खेसे – लोहगाव वाघोली

2.  बाबुराव दत्तोबा चांदेरे – सूस, म्हाळुंगे, बावधन

3. दत्तात्रय बबनराव धनकवडे – नऱ्हे,  शिवणे, उत्तमनगर, धायरी

4.  राकेश राजेंद्र कामठे – उंड्री, पिसोळी, वडाचीवाडी

6.  भगवान लक्ष्मण भाडळे – मंतरवाडी, देवाची ऊरुळी

6.  शांताराम रंगनाथ कटके – कटकेवाडी, वाघोली

7.  गणेश बाळासाहेब ढोरे – ढोरेवस्ती, फुरसुंगी, भेकराई नगर

8.  राहुल सदाशिव पोकळे – धायरी, पुणे

9. अजित दत्तात्रय घुले – मांजरी बु. ता. हवेली, पुणे