महाराष्ट्रात शाळा सुरू होणार?   – शाळा सुरु करण्याची मागणी वाढू लागली  : सोशल मीडियावर ट्रेंड

Homeमहाराष्ट्र

महाराष्ट्रात शाळा सुरू होणार? – शाळा सुरु करण्याची मागणी वाढू लागली : सोशल मीडियावर ट्रेंड

Ganesh Kumar Mule Aug 28, 2021 3:26 AM

PMRDA Latest News | 8 वर्ष झाली तरी PMRDA चे ऑडिट नाही! | मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
ST : Anil Parab : ‘एसटी’चे राज्य शासनात विलिनीकरण शक्य नाही!
Mahavikas Aghadi | Sinet Election | विद्यापीठाची परीक्षा पद्धती अधिकाधिक पारदर्शक करणार | अजित पवार

महाराष्ट्रात शाळा सुरू होणार?

– शाळा सुरु करण्याची मागणी वाढू लागली

: सोशल मीडियावर ट्रेंड

मुंबई/पुणे: कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. यामुळे मुलांचे मानसिक, शारीरिक, शैक्षणिक आरोग्य धोक्यात आल्याने लवकरात लवकर शाळासुरू कराव्यात, अशी मागणी सातत्याने होत आहे. या विषयावर परिसंवाद, चर्चा, सोशल मीडियावर आताशाळासुरूकरा अशी मोहीम सातत्याने सुरू झाली आहे.

दिल्लीमध्ये आणि गुजरात मध्ये शाळा सुरू करण्यात येणार असल्याच्या निर्णयानंतर या मागणीला जोर मिळाला आहे आणि महाराष्ट्रातही शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षणतज्ज्ञ, पालक व अभ्यासक करीत आहेत.

सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असताना मुले शाळेत जाण्यासाठी आतुर झाली आहेत.  दीर्घ काळ मुलांना शाळेपासून दूर ठेवणे त्यांच्या मानसिक व शैक्षणिक आरोग्याच्या दृष्टीने योग्य होणार नाही, असे मत युनिसेफ, युनेस्को आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेही नोंदविले आहे. जनजीवन सुरळीत सुरू आहे, मुले गटागटाने खेळत आहेत. शाळा मात्र गेले दीड वर्ष बंदच आहेत. यासाठी शाळा सुरू झाल्या पाहिजेत, असा सूर शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्यातून उमटत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0