बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!   : संभाव्य नुकसानभरपाईच्या 25% आगाऊ रक्कम खात्यावर जमा होणार   : आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीला यश

Homeमहाराष्ट्र

बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा! : संभाव्य नुकसानभरपाईच्या 25% आगाऊ रक्कम खात्यावर जमा होणार : आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीला यश

Ganesh Kumar Mule Aug 30, 2021 5:57 PM

Maharashtra Cabinet Meeting Decisions | राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय जाणून घ्या
Barshi: वगळलेल्या 48 गावांचेही होणार पंचनामे : बार्शी तालुक्याला दिलासा
Rejuvenation Project | PMC Pune | कै. विलासराव तांबे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रथम क्रमांकाचे बक्षीस

बार्शी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा!

: संभाव्य नुकसानभरपाईच्या 25% आगाऊ रक्कम खात्यावर जमा होणार
: आमदार राजेंद्र राऊत यांच्या मागणीला यश
बार्शी: बार्शी तालुक्यातील शेतकरी पावसाने ओढ दिल्यामुळे हवालदिल झाला होता. कारण पावसाच्या अभावी सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी केली जात होती. यालाच प्रतिसाद म्हणून बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. याची तात्काळ दखल घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानभरपाईच्या 25% आगाऊ रक्कम खात्यावर जमा करण्याचे आदेश संबंधित विमा कंपनीला दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
– पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान
बार्शी तालुक्यात चालु खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाची
पेरणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. माहे जुलै व ऑगस्ट या महिन्यामध्ये पिक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने किमान एक ते दिड महिना खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात फुल गळ झालेमुळे, तसेच हलक्या व मध्यम जमिनीतील पिके करपून गेल्यामुळे त्याला फुलधारणा झालेली नाही. त्यामुळे बार्शी तालुक्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी आपले स्तरावरुन सोयाबीन पिकाच्या नुकसानी बाबत शासन स्तरावर योग्य तो अहवाल देऊन अनुदान भरपाई मिळावी. अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना केली होती. याची जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेतली. त्यानुसार जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सरकारच्या जीआर चा आधार एक आदेश पारित केला आहे. त्यानुसार तालुक्यात  उत्पादनात सरासरीच्या जवळपा 68% घट  झाली आहे. त्यामुळे सोयाबीन व भुईमूग या पिकांच्या नुकसानीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांना संभाव्य नुकसानभरपाईच्या 25% आगाऊ रक्कम खात्यावर जमा करण्याचे निर्देश भारती एक्सा लाईफ इन्शुरन्स कंपनी ली, मुबई ला दिले आहेत. नुकसान भरपाईची आगाऊ रक्कम ही अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल. असे ही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0