बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे मध्ये गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन
: नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा उपक्रम
पुणे: बाणेर-बालेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्र .९ च्या वतीने सन २००६ साला पासून प्रभागातील महिला भगिनींसाठी आयोजित करत असलेली “ गौरी सजावट स्पर्धा ” यंदा पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच उत्साहाने कोरोनाचे नियम पाळून घेण्यात आली. धार्मिक सणांच्या निमित्ताने महिलांमध्ये असलेल्या कल्पकतेला वाव देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्याला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळतोय, हे या स्पर्धेचं मोठे यश आहे.
:2006 पासून आयोजन
या ” गौरी सजावट स्पर्धेचा ” उपक्रम बाणेर – बालेवाडी या परिसरातील नागरिकांसाठी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सुरू केला आहे आणि हा उपक्रम आज तागायत अखंड पणे चालू ठेवण्यात आलेला आहे. ही स्पर्धा गेल्या वर्षी कोरोनाचे वर्ष वगळता दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडते. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे स्पर्धा होऊ शकली नाही म्हणून यंदा तो उत्साह अधिक दिसून आला त्यामुळे महिला-भगिनींनी गौराईपुढं मोठ्या प्रमाणात आकर्षक सजावट केली होती. त्या अनुषंगाने कालच बाणेर-बालेवाडी आणि नव्याने पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे या दोन्हीं गावामध्ये सुद्धा गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गौरी सजावट स्पर्धेसाठी जवळपास ९०० महिलां भगिनींनी सहभाग नोंदविला होता .
अत्यंत कमी वेळेत या स्पर्धे करिता प्रत्यक्षात २२ कॅमेरामन शूटिंग घेण्यासाठी ठेवण्यात आलेले होते आणि जवळपास ७० ते ८० कार्यकर्ते आणि परीक्षक ह्या सर्व जणांनी मिळून जवळपास ८२६ महिलांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन गौरी सजावटीचे परीक्षण केले. परंतु आम्ही ज्या भगिनी पर्यंत पोहचू शकलो नाही आशा काही गौरी सजावटीचे फोटो आम्हाला प्राप्त झाले आहेत. या स्पर्धेसाठी महिला भगिनींनी प्रचंड उत्कृष्ट असा प्रतिसाद या स्पर्धेकरिता दिलेला आहे .
या स्पर्धेचे सुस भागात संगिता बाळासाहेब भोते, म्हाळुंगे मध्ये समृध्दी विवेक खैरे, बालेवाडी भागात दिप्ती राजेश बालवडकर, बाणेर मध्ये पोर्णिमा तानाजी मांडेकर, विधाते-मुरकुटे वस्ती या परिसरात वासंती रेणुसे या ठिकाणी स्पर्धेचे औपचारिक उदघाटन केले . उदघाटन प्रसंगी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक आणि या कार्यक्रमाचे आयोजक बाबुराव चांदेरे, नितीन कळमकर, डॉ.सागर बालवडकर ,चेतन बालवडकर, रुपाली सागर बालवडकर, पुनम विशाल विधाते, सुषमा ताम्हाणे, कविता बोरावके, राखीताई श्रीराव, डॉ .मीना विधाळे, माधुरी इंगळे, प्राची सिद्दकी, वैशाली कलमानी, जान्हवी मनोज बालवडकर, अश्विनी समिर चांदेरे, पुजा किरण चांदेरे, प्राजक्ता ताम्हाणे आदी महिला भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते .
सदर या गौरी सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. २ ऑक्टोबर रोजी ,सायंकाळी ४ वाजता बाणेर येथील बंटारा भवन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे .
COMMENTS