गणेश मंडळांना दोन स्वागत कमानीसाठी असेल परवानगी!   :  गणेश मंडळांना यंदा बाप्पा पावणार!   : मागच्या वर्षी स्वागत कमानीना घातली होती बंदी

HomeपुणेPMC

गणेश मंडळांना दोन स्वागत कमानीसाठी असेल परवानगी! : गणेश मंडळांना यंदा बाप्पा पावणार! : मागच्या वर्षी स्वागत कमानीना घातली होती बंदी

Ganesh Kumar Mule Aug 29, 2021 9:05 AM

Illegal cables : अनधिकृत केबल्स नियमित करण्यासाठी शुल्क!
Transfer of three Deputy Commissioners in Pune Municipal Corporation!  
Nalstop Double flyover : नळस्टॉप दुहेरी उड्डाणपूल कधीपासून होणार खुला ! : महापौरांनी दिली ही माहिती
गणेश मंडळांना दोन स्वागत कमानीसाठी असेल परवानगी!
:  गणेश मंडळांना यंदा बाप्पा पावणार!
: मागच्या वर्षी स्वागत कमानीना घातली होती बंदी
पुणे: शहरातील कोरोनाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना अजून पूर्ण संपला नाही. त्यामुळे याचे सावट उत्सवावर पडलेले दिसून येते. यातून गणेश उत्सव देखील सुटलेला नाही. मागील वर्षी गणेश उत्सव साजरा करण्यावर पूर्णपणे बंदी घातली होती. त्यामुळे गणेश मंडळाचं अर्थकारण देखील कोलमडले होते. मात्र या वर्षी मंडळांना गणपती बाप्पा पावणार आहे. महापालिकेने मागील वर्षी गणेश मंडळांना स्वागत कमानी घालण्यावर बंदी घातली होती. यावर्षी मंडळांना उत्सवासाठी त्यांचे उत्सव मंडपाच्या प्रवेशद्वारापासून ५० मी. अंतरापर्यंत दोन स्वागत कमानी उभारणेस परवानगी देण्यात येईल. यासाठी महापालिकेने नियमावली तयार केली आहे. लवकरच ही नियमावली जाहीर केली जाईल. असे महापालिका प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
– २०१९ सालाचेच मंडप व ध्वनी परवाने
पुणे शहरातील या वर्षीचा गणेशोत्सव १० सप्टेंबर ते  १९ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. शहरातील कोविड-१९ साथरोगाची सध्याची पार्श्वभूमी विचारात घेता गणेशमंडळांनी व नागरिकांनी यावर्षीचे गणेशोत्सव व नवरात्रोत्सव महाराष्ट्र शासन व स्थानिक प्रशासन यांचेकडील सूचनांचे पालन करून अत्यंत साधेपणाने साजरा करणेकामी  कार्यपद्धती अवलंबविणेबाबत पुणे महानगरपालिकेतर्फे नियमावली तयार केली आहे. त्यानुसार विसर्जन करण्यात येणारी मंडळांकडील मूर्ती ४ फुटापेक्षा व घरगुती २ फुटापेक्षा मोठी नसावी. गणेश मंडळांनी शक्यतो त्यांचे गणेश / देवीचे मंदिरामध्येच यावर्षी गणेशमूर्तीची स्थापना करावी. ज्यांना गणेशमंदिर उपलब्ध नसेल, त्यांनी लहान आकारात मंडप उभारून मूर्तीची स्थापना करावी.यावर्षी देखील गणेश / देवी स्थापना मंडप/कमान व ध्वनीपरवाने घेण्याची आवश्यकता राहणार नाही. या वर्षाकरिता सन २०१९ सालाचेच मंडप परवाने व ध्वनी परवाने ग्राह्य धरण्यात येतील. आगामी काळात राज्य शासनाकडील येणारीपरिपत्रके / आदेश / सूचना यांचे पालन करावे लागेल.

– 50 मी अंतरापर्यंत 2 कमानी लावता येतील
मंडळांना उत्सवासाठी त्यांचे उत्सव मंडपाच्या प्रवेशद्वारापासून ५० मी. अंतरापर्यंत दोन स्वागत कमानी उभारणेस परवानगी देण्यात येईल. मात्र कमानी उभारताना वाहनांचे वाहतुकीस व नागरिकांचे रहदारीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी. आगामी काळात झालेल्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मंडप/कमान उभारणी कमी आकारामध्ये करून बाजूने रुग्णवाहिका, रिक्षा इ. वाहने जाण्यासाठी मोकळी जागा ठेवावी. पोलीस विभागाकडील सर्व सूचनांचे पालन करावे. गणेश मंडळांनी मंडप/कमानीच्या दर्शनी भागात सन २०१९ सालाची परवाना प्रत प्लास्टिक कोटिंगमध्ये लावावी. यावर्षी मंडळानी गणेश व देवीची मूर्ती स्थापना व विसर्जनाचे वेळी मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. मंडळानी मूर्तीचे विसर्जन मंडपालगत पाण्याच्या हौदामध्येच मूर्तीचे विसर्जन करावे. सर्व घरगुती मूर्तीचे देखील विसर्जन नागरिकांनी घरच्या घरी करावे. याकरिता सोडियम बाय कार्बोनेट संबधित क्षेत्रीय कार्यालयामध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. सार्वजनिक घाटांची/विसर्जन हौदाची सुविधा यावर्षी मनपाकडून केली जाणार नाही. तथापि मनपा प्रशासनाकडून गणेशमूर्तीच्या विसर्जनाकरिता फिरत्या वाहनामधील हौद तसेच मूर्ती संकलन केंद्रे व निर्माल्य संकलन व्यवस्था, इ. सुविधा शहरातील तसेच नविन हद्दवाढ झालेल्या गावांमध्ये नागरिकांकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे.
– विक्री स्टॉलला रस्ते व फुटपाथ वर परवानगी नाही
स्थानिक रहिवाश्यांना/पदपथांवरील पादचाऱ्यांना/वाहनांना अडथळा होणार नाही, ध्वनीप्रदुषणाचा त्रास होणार नाही
याची मंडळानी दक्षता घ्यावी. उत्सव कालावधीत नागरिकांना खालील माध्यमाद्वारे तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.  तक्रारींचे निराकरण सर्व क्षेत्रिय कार्यालय स्तरावर | सर्व स्थानिक पोलीस स्टेशनवर करण्यात येईल. सण/उत्सवांचे कालावधीत कोणत्याही अडचणींबाबत गणेश मंडळ/नागरीकांनी संबंधित मनपा क्षेत्रिय कार्यालयांशी संपर्क साधावा. यावर्षी गणेशमूर्तीची खरेदी मंडळांनी/नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करावी. यावर्षी देखील गणेशमूर्ती विक्री स्टॉलला मनपा रस्ता, पदपथांवर परवानग्या दिल्या जाणार नाहीत. अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. परंतु गणेशमूर्ती विक्री स्टॉलकरिता सर्व क्षेत्रिय कार्यालय हद्दीतील मनपा शाळांची पटांगणे, मनपा मोकळ्या जागांवर मनपाच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून परवानग्या देण्याचे नियोजन केले जाईल. उत्सव कालावधीत रस्ता/पदपथांवर सिझनेबल खाद्यपदार्थ विक्रेत्यांना अधिकृत परवानगी मिळणार नाही. अनधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायास पूर्णपणे प्रतिबंध केला जाईल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0