गणपती विक्रीसाठी ५९१ जागा निश्चित!    : रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यास बंदी   : महापालिका प्रशासनाची माहिती

HomeपुणेPMC

गणपती विक्रीसाठी ५९१ जागा निश्चित! : रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यास बंदी : महापालिका प्रशासनाची माहिती

Ganesh Kumar Mule Sep 01, 2021 4:01 PM

PMC : ….म्हणून नागरिकांना नीट वागणूक द्यावी लागणार!
 Disaster management training for 2250 security guards in Pune Municipal Corporation!
PMC Employees Income Tax | वेतनातून Income tax कपात होऊनही पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस!

गणपती विक्रीसाठी ५९१ जागा निश्चित!

रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यास बंदी

पुणे:  गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना महापालिकेने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी खास नियोजन केले आहे. शहराच्या ३९ भागात ५९१ जागा निश्‍चीत केल्या आहेत. प्रत्येक स्टॉलसाठी ९ हजार रुपये भाडे निश्‍चीत केले आहे. रस्त्‍यावर किंवा पादचारी मार्गावर स्टॉल लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमध्ये रस्त्याच्या कडेल स्टॉल लावून गणेश मूर्तींची विक्री केली जाते. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. कोरोनामुळे एकाच ठिकाणी गर्दी झाल्यास त्यातून संसर्गाचा धोका वाढू शकतो, त्यामुळे महापालिकेने मूर्ती विक्रीच्या स्टॉलसाठी नियोजन केले आहे. शहरातील ३९ भागात ५९१ स्टॉलसाठी जागा आहे, प्रत्येक स्टॉलहा १५ बाय १० इतक्या मापाचा असणार आहे. ज्यांना स्टॉल लावायचे आहेत, त्यांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयास अर्ज करावा. महापालिकेतर्फे केवळ जागा उपलब्ध करून दिले जाणार असून, त्याठिकाणी मांडव टाकणे, सॅनिटायझरची व्यवस्था करणे यासह सुरक्षेची जाबबदारी व्यावसायिकावर असणार आहे. याची अधिक माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे मुठे यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0