शांतिलाल सूरतवाला, आरडे, पासलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश  : पालकमंत्री अजित पवारांनी केले स्वागत

Homeपुणे

शांतिलाल सूरतवाला, आरडे, पासलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश : पालकमंत्री अजित पवारांनी केले स्वागत

Ganesh Kumar Mule Sep 03, 2021 1:30 PM

Pune Metro News | जिल्हा न्यायालय-स्वारगेट भुयारी मेट्रोमार्ग काही दिवसांतच पुणेकरांच्या सेवेत’ | स्वारगेट-कात्रज मेट्रोमार्गाचेही त्याचवेळी भूमिपूजन
Dr. Ramesh Shelar PMC | मालमत्ता विवरण पत्राच्या आदेशातील संदर्भानुसार न्याय देण्याची डॉ रमेश शेलार यांची मागणी
PMC Hospitals HMIS System | पुणे महापालिकेच्या 5 दवाखान्यात आता अत्याधुनिक संगणक प्रणाली | कामकाजात आणली जाणार गतिमानता! 

शांतिलाल सूरतवाला, आरडे, पासलकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

: पालकमंत्री अजित पवारांनी केले स्वागत

पुणे : माजी महापौर व ज्येष्ठ नेते  शांतिलाल सूरतवाला, माजी नगरसेवक  लक्ष्मण आरडे, माजी नगरसेविका  वैजयंती पासलकर, राजाभाऊ पासलकर, रमेश भांड आणि सलीम शेख यांनी शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ज्येष्ठ गायक व पक्षाचे नेते आनंद शिंदे, प्रदीप गारटकर, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची उपस्थिती होती.

: राष्ट्रवादीच शहराला पुन्हा विकासवाटेवर आणू शकतो

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  शरद पवार, अजितदादा यांच्या नेतृत्वावर व विचारांवर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहोत.  पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि  अजितदादांची दूरदृष्टी व विकासकामांप्रति असलेले झपाटलेपण यामुळे निश्चितच राज्याचा आणि पुण्याचा विकास होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच पुणे शहराला पुन्हा विकासवाटेवर आणू शकतो, असा विश्वास या वेळी सर्व माननीयांनी पक्ष प्रवेश करताना व्यक्त केला.
 पवार साहेब व अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. यामुळे निश्चितच पक्षाची ताकद वाढणार आहे. तसेच, पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीत सत्तापरिवर्तनाच्या मोहिमेला बळ मिळणार आहे, असा विश्वास पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.