मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी   : पुण्यात मनसेला देणार टक्कर   दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे

Homeपुणेमहाराष्ट्र

मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी : पुण्यात मनसेला देणार टक्कर दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे

Ganesh Kumar Mule Sep 04, 2021 1:30 PM

Hadapsar-Wagholi-Manjari Road | हडपसर-मांजरी-वाघोली रस्त्यासाठी सिरम कडून 26 कोटींचा निधी | रस्त्याला विलू पुनावाला यांचे नाव देण्याबाबत सरकारची शिफारस
Junior Engineer | PMC | कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Acharya Vinoba Bhave app : शाळा सुधार कार्यक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या आचार्य विनोबा भावे ॲपचे उद्घाटन

मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी

: पुण्यात मनसेला देणार टक्कर

: दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराकडे विशेष लक्ष दिले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या रणनीतीला मात देण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची पुणे संपर्क प्रमुखपदावर नेमणूक केली. विशेष म्हणजे मनसेमधून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांची पुणे सहसंपर्कपदी नेमणूक केली आहे.

: सचिन अहिर होते राष्ट्रवादीत

अहिर यांनी जुलै २०१९मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. सेना प्रवेशापूर्वी अहिर यांचा राष्ट्रवादीत मोठा दबदबा होता. १९९९ मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा आमदार बनले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात २००९ मध्ये ते गृहनिर्माण राज्यमंत्री होते. आदित्य शिरोडकर यांनी मनसेमध्ये असताना शिक्षण विभागाशी संबंधित काम करत तरुणांचे नेतृत्व केले. या दोघांच्या अनुभवांचा पुण्यात उपयोग करून घ्यायचा असे शिवसेनेने ठरविल्याचे दिसते.

मुंबईबरोबरच पुण्यातही मनसेनं शिवसेनेची मतं आपल्याकडं वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेला स्वबळावर सत्तेत येण्याची संधी नसली तरी राज्यातील सत्तेचा लाभ उठवत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेतून आलेल्या अनुभवी शिलेदारांवर पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं समजतं.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0