मनसे मधून शिवसेनेत आलेल्या या नेत्याकडे शिवसेनेने सोपवली महत्वाची जबाबदारी
: पुण्यात मनसेला देणार टक्कर
: दोन अनुभवी नेत्यांकडं शहराची जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी गेल्या काही दिवसांपासून पुणे शहराकडे विशेष लक्ष दिले असून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बळकटीवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या या रणनीतीला मात देण्यासाठी शिवसेनेने शुक्रवारी शिवसेना उपनेते सचिन अहिर यांची पुणे संपर्क प्रमुखपदावर नेमणूक केली. विशेष म्हणजे मनसेमधून शिवसेनेत आलेल्या आदित्य शिरोडकर यांची पुणे सहसंपर्कपदी नेमणूक केली आहे.
: सचिन अहिर होते राष्ट्रवादीत
मुंबईबरोबरच पुण्यातही मनसेनं शिवसेनेची मतं आपल्याकडं वळविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. पुणे महापालिकेत शिवसेनेला स्वबळावर सत्तेत येण्याची संधी नसली तरी राज्यातील सत्तेचा लाभ उठवत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेतून आलेल्या अनुभवी शिलेदारांवर पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याचं समजतं.
COMMENTS