आरोपींच्या मनात पोलिसांची जरब बसायला हवीय   : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी शिष्टमंडळाने घेतली भेट   : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी

Homeपुणेमहाराष्ट्र

आरोपींच्या मनात पोलिसांची जरब बसायला हवीय : पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी शिष्टमंडळाने घेतली भेट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Sep 10, 2021 1:10 PM

Plogathon Drive | G20 Pune | प्लॉगेथॉन ड्राईव्ह मध्ये 11 हजार 800 किलो कचरा संकलन
PMC Recruitment Rules | पुणे महापालिकेत नवीन पद निर्मिती! | परिमंडळ आरोग्य अधिकारी ची नवीन ५ पदे 
Kasba Constituency | कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची हेमंत रासने यांची महापालिका प्रशासनाकडे आग्रही मागणी 

आरोपींच्या मनात पोलिसांची जरब बसायला हवीय

: पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची राष्ट्रवादी शिष्टमंडळाने घेतली भेट

: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना तात्काळ शिक्षा करण्याची मागणी

पुणे: पुणे शहरामध्ये काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या दोन घटना उघडकीस आल्या.  करोनाच्या दुसऱ्या लाटेतून शहर सावरत असताना आणि सामान्य नागरिक सण-उत्सवांची तयारी करत असताना, या दोन्ही घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये आरोपींनी अतिशय घृणास्पद कृत्य केले. त्यामुळे, प्रत्येक संवेदनशील व्यक्ती अस्वस्थ झाली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये पुणे पोलिसांनी तातडीने छडा लावला आणि आरोपींना बेड्या ठोकल्या, ही त्यामध्ये सर्वांसाठीच दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र असे गुन्हे घडणार नाहीत यासाठी आरोपींच्या मनात पोलिसांविषयी जरब बसायला हवीय. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस च्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली.

: आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे

याबाबत शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले कि, देशामध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक आणि नव्या पिढीच्या आकांक्षांना वाव देणारे शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यामध्ये अशा घटना घडणे, शहरासाठी अजिबात भूषणावह नाही. असे प्रकारच बंद व्हायला हवेत आणि आरोपींच्या मनामध्ये पोलिसांविषयी जरब बसायला हवी,  अशी सर्वसामान्यांची भावना आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तातडीने छडा लावून या प्रकरणाचे गांभीर्य आणि त्याबाबतची तत्परता दाखवून दिली आहे. मात्र, या प्रकरणातील आरोपींविरोधात ठोस पुराव्यांच्या आधारे आरोपपत्र सादर करावे. जेणेकरून आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा वासनांध, नराधमांबाबत कोणतीही गय केली जाऊ नये, अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही, अशी जरब बसायला हवी. तसेच, या प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लागावा, अशी मी समस्त पुणेकरांच्या वतीने मागणी करतो. जगताप पुढे म्हणाले वरील दोन्ही घटना पुणे स्टेशन परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे, पुणे स्टेशनबरोबरच बसस्थानके, शहरातील मध्यवर्ती बाजारपेठा, महत्त्वाचे चौक अशा गजबजलेल्या ठिकाणांवर आणखी कडक उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे. या ठिकाणांवर पोलिस तैनात करणे किंवा गस्त वाढवणे, या उपायांबरोबरच स्थानिक नागरिकांची मदत घेणे आणि अन्य वेगवेगळ्या उपायांचीही अंमलबजावणी करता येऊ शकेल. तसेच, अल्पवयीन मुली आणि महिलांविरोधातील गुन्हे रोखण्यासाठी आणखी जनजागृती करण्याचीही गरज व्यक्त होत आहे. ही केवळ पोलिसांचीच जबाबदारी नाही, ही गोष्ट आम्ही समजू शकतो. त्यामुळे, पोलिसांनी या विषयी पुढाकार घेत, जनजागृतीसाठी दिशा दिली, तर सुरक्षित पुण्यासाठी आम्हीही आमचे योगदान देऊ. आपल्या एकत्रित प्रयत्नांमधून महिलांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावर शहरामध्ये पुरेशी जनजागृती करू आणि समाजामध्ये असणारी महिला अत्याचाराची ही कीड समूळ नष्ट करू शकू, असा विश्वास आम्हाला वाटतो. असे ही जगताप म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0