महापालिकेच्या आरोग्य वर्धिनी केंद्रात योगा प्रशिक्षण
: पुणेकरांना मिळतोय लाभ
पुणे : राज्य सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने आपल्या आरोग्य वर्धिनी केंद्रात योग प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. त्याचा पुणेकरांना चांगलाच लाभ होताना दिसतोय. सरकारने दिलेल्या टार्गेट पैकी 80% काम महापालिकेने पूर्ण केले आहे. अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ वैशाली जाधव यांनी दिली.
याबाबत डॉ जाधव यांनी सांगितले कि, Non communicable disease रोखण्यासाठी योगाचा चांगला उपयोग होताना लक्षात येत आहे. राज्य सरकारने याबाबत गंभीरतेने लक्ष दिले आहे. याचाच भाग त्यानुसार महापालिकेने योग सेशन सुरु केले होते. महापालिकेने तयार केलेल्या 35 आरोग्य वर्धिनी केंद्रात या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये 35-40 च्या पुढ वय असणाऱ्या लोकांना प्रवेश दिला जातो. डॉ जाधव यांनी पुढे सांगितले कि योग सेंटर मधील लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी लोकशिक्षक नेमण्यात आले आहेत. त्यांना एका सेशन साठी 250रु दिले जातात. सरकारने महापालिकेला 2100 सेशन घेण्यास सांगितले होते. महापालिकेने 1692 सेशन पूर्ण केले आहेत. म्हणजेच 80% काम पूर्ण केले आहे.
COMMENTS