महाविकास आघाडी सरकारने दिलेली उद्दिष्ट्ये महापालिका पूर्ण करणार का?
महाविकास आघाडी सरकारने महापालिका प्रशासनाला शाश्वत विकासाची उद्दिष्टे दिली आहेत. यामध्ये शहरी भागातील गरीब कुटुंबांना पाणीपट्टी माफ करणे, मालमत्ता कर सवलत / माफी देणे, अशा विविध योजनांचा समावेश आहे. महापालिका ही उद्दिष्टे पूर्ण करू शकणार का? दोन वर्षांपूर्वीच हे आदेश देण्यात आले आहेत.
ही आहेत उद्दिष्टे
अ) शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी महापालिका व नगरपालिका अंतर्गत कौशल्य विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण व अनुदानाचे कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे.
आ) गरीब महिलांना त्यांचे शहरी स्वयंसहाय्यता बचत गटामार्फत उत्पन्नाची साधने मिळण्यासाठी महापालिका व नगरपालिकांमधून देण्यात येणाऱ्या छोट्या कंत्राटांमध्ये आरक्षण देण्यात यावे.
) शहरी भागातील गरीब कुटुंबांना पाणीपट्टी माफ करणे, मालमत्ता कर सवलत / माफी देणे. (मुंबई महापालिकेने पाचशे चौ. फूट पर्यंत माफी दिली आहे.) महापालिका नगरपालिकांच्या शाळांमध्ये स्मार्ट कोर्सेस सुरु कोर्स उपलब्ध करून देणे, डिजिटल व टॅबदद्वारे शिक्षणावर भर देणे, गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. महापालिका क्षेत्रात निवारा केंद्र चालवणे.
ऊ) महापालिका / नगरपालिकांचे दवाखाने अधिक बळकट करणे, तेथील डॉक्टर नर्सेसची रिक्त पदे भरणे, वैद्यकीय उपकरणे सेवा सुविधा पुरवणे, साथरोग प्रतिबंधाचे काम अधिक प्रभावी रीतीने करणे.
ए) नगरपालिका / महानगरपालिकांमधील सर्व समित्यांमध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवणे.
ऐ) नैसर्गिक आपत्ती पूर/आग याचे प्रतिबंधासाठी सार्वत्रिक प्रभावी उपाययोजना करणे.
ओ) हवेची शुद्धता, सार्वजनिक कचरा विलगीकरण, पुनर्वापर व व्यवस्थापन यानुसार नगरपालिका/महापालिका यांचेमध्ये स्पर्धा ठेवून मानांकन जाहीर करणे यात उत्कृष्ट ठरणाऱ्या संस्थाचा गौरव करणे.
औ) आर्थिक दुर्बल घटकांसाठी आवास योजना योजना चा कार्यक्रम राबवणे.