Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 

HomeBreaking Newsपुणे

Supriya Sule Vs CM | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण 

Ganesh Kumar Mule Jul 15, 2022 9:00 AM

Prashant Jagtap | NCP Pune | मुख्यमंत्र्यांनी निष्क्रिय आरोग्यमंत्र्यांचा व वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा | प्रशांत जगताप
CM Eknath Shinde | प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा
Mukhyamantri Vayoshri Yojana | मुख्यमंत्री वयोश्री योजना, ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! अर्ज करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुप्रियाताईंना का वाटते काळजी? सुप्रियाताईंनी दिले स्पष्टीकरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मला फार काळजी वाटते आहे . त्यांना प्रॉम्पटींग करणे, चिठ्ठी देणे यासह त्यांना कमी दाखवण्याचे काम उपमुख्यमंत्री करत आहेत. सध्या अडचणीत आलेले शेतकरी, नागरिक यांच्यासाठी या सरकार ने कामे करावे, असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असलेले मंत्री जातात, असा टोलाही खासदार सुळे यांनी भाजपला लगावला.

शिवसेनेतून बाहेर पडून  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनी भाजपसोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केले आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बिचारे आहेत. यामागे मागे मोठे षडयंत्र आहे, त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुढे बोलताना सुळे म्हणाल्या, दिपक केसरकर यांच्या बरोबर मी खूप वर्ष कामे केले आहेत. त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांची चिंता आहे. सध्या कोण कुठल्या पक्षात आहे हे आजकाल कळतच नाही. मी स्वतः गोंधळात आहे. सध्या राज्यात जे राजकारण जे चाललं आहे ते महाराष्ट्राला शोभत नाही.

काल राज्य शासनाने संरपंच आणि नगराध्यक्ष ही पदे प्रत्यक्षरित्या जनतेतून निवडली जातील अशी घोषणा केली. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, सरपंच आणि सदस्या बॉडी वेगळी झाली तर एकत्र चर्चा होत नाही. त्यामुळे याचा वाईट परिणाम होईल.  राजकारण म्हणजे व्यवसाय नाही. लोकांकडून पैसे घेणे, धमक्या देणे हे राजकारण नाही, असंही खासदार सुळे म्हणाल्या.

पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित केलेल्या सहभागी झालेल्या महिलांना प्रमाण पत्र वाटप समारंभ निमित्त सुप्रिया सुळे, रुपाली चाकणकर उपस्थितीत होत्या.