एक्झिट पोल मध्ये कुणाकडे आहे कल? जाणून घ्या सविस्तर
पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीचा एक्झिट पोल आल्याचे सांगितले जात आहे. या दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडी आणि भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या ठिकाणी प्रचारासाठी गेले होते. याशिवाय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळाही मोठ्या प्रमाणावर उडाल्याचे पाहायला मिळाले. या पोटनिवडणुकीचा निकाल ०२ मार्च रोजी लागणार आहे.
पुण्यातील कसबा पेठ निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. शिवाय मतदानाच्या दिवशीही अनेक ठिकाणी गोंधळ पाहिला मिळाला होता. कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट लढत आहे. तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप, नाना काटे आणि राहुल कलाटे अशी लढत पाहायला मिळत आहे. रिंगसाईड रिसर्च आणि स्ट्रेलिमा संस्थेने एक्झिट पोल वर्तवला आहे.
द स्ट्रेलेमा संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार चिचवडमध्ये भाजपला जागा राखण्यात यश मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला १ लाख ५ हजार ३५४ मते मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना ९३ हजार आणि राहुल कलाटे यांना ६० हजार १७३ मते मिळण्याचा अंदाज आहे.