ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊ
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांची ग्वाही
बार्शी : ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी दिली. पंचायत समिति बार्शी, येथे तालुक्यातील सरपंच, पंचायत समिती सदस्य व अधिकाऱ्यांची संयुक्त आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार रूट यांनी ही ग्वाही दिली.
: अनेक सरपंचांनी आपले प्रश्न, समस्या सांगितल्या
या बैठकीत तालुक्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विविध विकास कामे करताना येणाऱ्या अडी-अडचणी, प्रश्न जाणून घेऊन, त्यांवर मात करून गावचा विकास करण्यावर मी आमदार या नात्याने सर्वतोपरी मदत करीन असे अभिवचन दिले. ग्रामपंचायतीस विविध प्रकारच्या योजनांमधून निधी उपलब्ध करून देऊन गावचा व तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. या बैठकीत अनेक सरपंचांनी आपले प्रश्न, समस्या सांगितल्या. ते प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. गावातील पाण्याचा प्रश्न, रस्ते, गटारी, दिवाबत्ती, घरकुले, दलित वस्ती योजना, जिल्हा परिषद शाळांचा स्तर उंचावणे, पाझर तलाव, साठवण तलाव, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीज आदी विषयांवर सरपंचां सोबत सकारात्मक चर्चा झाली.
या बैठकीस पंचायत समिती सभापती अनिल काका डिसले, गटविकास अधिकारी शेखर सावंत, उपसभापती मंजुळा वाघमोडे, माजी उपसभापती अविनाश मांजरे ,प्रमोद वाघमोडे, ज्येष्ठ नेते ॲड. अनिल पाटील, इंद्रजीत चिकणे, उमेश बारंगुळे, सुमंत गोरे, बाजार समितीचे संचालक वासुदेव बापू गायकवाड व सरपंच बंधू-भगिनी उपस्थित होते.
COMMENTS