: उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे -राज्यात करोना बाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, लोकांना याचे गांभीर्य नाही. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारी महिन्यात खूप काळजी घ्यावी लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आम्हालाही निर्बंध लावायला चांगले वाटत नाही. त्यामुळे सर्वांनीच नियमांचे पालन करावे, असे आवाहन पवार यांनी केले.
पवार यांनी सांगितले की, वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना बूस्टर डोस दिला पाहीजे, असाही निर्णय झाला आहे. 18 वर्षांपासून सर्वांनी दोन्ही डोस घेतले पाहिजे. जिल्ह्यात 100 टक्के नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. मात्र, दुसरा डोस घेण्यासाठी लोक पुढे येत नाहीत.
यात राजकारण न आणता काम केले पाहिजे. हे सर्व जनतेच्या सहभागाशिवाय होणार नाही. यावेळी पवार म्हणाले की, मी सभागृहात आल्यापासून ते जाईपर्यंत मास्क लावलेला असतो. बोलताना काढत नाही. आपल्याला नियम पाळावेच लागणार आहे. आपणच नियम पाळत नसू तर लोकांना सांगायचा अधिकार नाही.
नवीन वर्षाचं स्वागत घरातच करा…
नवीन वर्षाचे स्वागत बाहेर न करता घरातच करा. आम्हालाही बंधन घालायला बर वाटत नाही. आत्ता कुठे परिस्थिती सुधारत होती. पण, परत नवी समस्या निर्माण झाली. काही राज्यांनी रात्रीचं लॉकडाऊन लावले आहे. काहींनी तर निवडणूक पुढे ढकल्या असल्याचे पवार यांनी सांगितले.
COMMENTS