Water Cut : Pune : गुरुवारी शहरातील ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद 

HomeBreaking Newsपुणे

Water Cut : Pune : गुरुवारी शहरातील ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद 

Ganesh Kumar Mule Jan 31, 2022 12:54 PM

Canal Advisory Committee : समान पाणी पुरवठा योजनेमुळे पुण्याला असमान पाणीपुरवठा : कालवा सल्लागार समिती बैठक : खासदार गिरीश बापटांचा सभात्याग 
Manjusha Nagpure : Suncity Road : सनसिटी रस्त्यावरची वाहतूक कोंडी सुटणार : रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात
Encroachment action at night : आता रात्री देखील अतिक्रमण कारवाई! 

गुरुवारी शहरातील ‘या’ भागांचा पाणीपुरवठा राहणार बंद

पुणे : गुरुवारी पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती LLR टाकीचे मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडण्यासाठीचे कामामुळे व नवीन होळकर व चिखली पम्पिंग भाग, भामा आसखेड जलकेंद्र परिसर येथील विद्युत / पम्पिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे . तसेच शुक्रवार रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

१) पर्वती (LLR) जलकेंद्र परिसर :- शहरातील सर्व पेठा (बुधवार दि. ०२/०२/२०२२ रोजी रात्री १०.०० ते गुरुवार दि. ०३/०२/२०२२ रोजी रात्री १०.०० पर्यंत पाणीपुरवठा बंद व शुक्रवार दि. ०४/०२/२०२२ रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.) डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ व नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
२) सहकार नगर:- सहकार नगर नं. २ मधील सर्व भाग, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर मनपा शाळा क्र. १११ चा भाग या परिसरातील गुरुवार दि. ०३/०२/२०२२ पाणीपुरवठा दु. १२.०० ते रात्री ८.०० पर्यंत बंद राहणार आहे.
३) लष्कर जलकेंद्र परिसर:- बेकर हिल जुन्या टाकीवर अवलंबून असणारा कौसर बाग परिसर, एन.आय.बी.एम. रोड, उंड्री रोड, साळुके विहार रोड, उजवीबाजू, लोणकर गार्डन परिसर, वानवडी परिसर काही भाग, कोंढवागावठाण, भाग्योदय नगर, मिठानगर, शिवनेरी नगर, गल्ली क्र.१, स.नं. ३५४, ब्रम्हा इस्टेट, कृष्णा केवल, फकरी हिल, कुबेरा पार्क,ब्रम्हा एव्हेन्यू, शिवगंगा कॉम्प्लेक्स, निवृत्ती एन्क्लेव्ह, माउंटकार्मल स्कूल, सहाणी सुजाणा पार्क, लुल्ला नगर, संपूर्ण परिसर.वानवडी, साळुके विहार रोड दोन्ही बाजू, केदारी नगर, आझाद नगर, शांती नगर, शिवरकर रोड दोन्ही बाजू, विकासनगर, जगताप नगर, शिंदे छत्री, SRP गट क्र. २ चा भाग, तात्या टोपे सोसायटी परिसर, शिवानंद, दयानंद सोसायटी, जगताप चौक व जांभूळकर चौक परिसर, संविधान
चौक परिसर, रहेजा गार्डन, गंगा सॅटेलाईट परिसर.
४) नवीन होळकर व चिखली पम्पिंग भाग- विद्यानगर, तिन्ने नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुला रोड इत्यादी.
५) भामा आसखेड जलकेंद्र परिसर:- लोहगाव, विमान नगर वडगाव शेरी, कल्याणीनगर विश्रांतवाडी फुलेनगर येरवडा इत्यादी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 1