Water Cut in Pune City : शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

HomeपुणेBreaking News

Water Cut in Pune City : शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

Ganesh Kumar Mule Mar 21, 2022 12:07 PM

PMC Pune Property tax | 184 crore rupees deposited in the coffers of Pune Municipal Corporation from property tax
Canal Advisory Committee | सध्या तरी पुण्यात पाणीकपात नाही! मात्र आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवण्याबाबत बैठकीत चर्चा
New Parliament Building | Vinayak Deshpande | नव्या संसद भवनाच्या निर्मितीचे नेतृत्व करणारे पुण्याचे सुपुत्र विनायक देशपांडे यांचा रविवारी सत्कार

शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद

पुणे : गुरूवार दिनांक २४/०३/२०२२ रोजी पर्वती जलकेंद्र पंपींग, एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २५/०३/२०२२ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती जलकेंद्र भाग (पर्वती,पद्मावती,इंदिरानगर पंपींग)- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, पर्वती गाव, सहकार नगर, सातारा रोड परीसर, पद्मावती, बिबवेवाडी, इंदिरानगर परीसर, कर्वे रोड ते एस. एन. डी. टी. परीसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर,सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र.
चतुःश्रृंगी /एस.एन.डी.टी/वारजे जलकेंद्र परीसर :-पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतुःश्रृंगी परिसर, गोखले नगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधान, बाणेर, चांदणी चौक इ. परिसर किष्किंदा नगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परीसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे युनिर्व्हसिटी परीसर, वारजे हायवे परीसर, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्लयुलर नगर, अतुल नगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुध्दीकरणाचा परीसर, औंध बावधन,
सुस, सुतारवाडी, भुगाव रोड परीसर इत्यादी.
नवीन व जुने होळकर जलकेंद्र पंपींग भाग :- विद्यानगर, टिंगरे नगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुळा रोड, खडकी,MES, HE Factory,हरीगंगा सोसायटी इत्यादी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0