Water cut in Main area of city : शहराच्या प्रमुख भागात गुरुवारी पाणी बंद! 

HomeपुणेBreaking News

Water cut in Main area of city : शहराच्या प्रमुख भागात गुरुवारी पाणी बंद! 

Ganesh Kumar Mule Feb 21, 2022 12:59 PM

PMC Budget Dispute : हेमंत रासनेंच्या  अंदाजपत्रकावर आयुक्त घेणार राज्य सरकारचे मार्गदर्शन 
Sarasbagh Chaowptty | सारसबाग चौपाटी कारवाई थांबवण्यात यावी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे महानगरपालिका आयुक्तांना निवेदन
MWRRA : PMC : पाटबंधारे विभागा नंतर आता जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाचे देखील महापालिकेला ‘हे’ आदेश 

शहराच्या प्रमुख भागात गुरुवारी पाणी बंद!

पुणे : गुरुवार दिनांक २४/०२/२०२२ रोजी लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील सोमवार पेठ, नरपतगीरी चौक ते १५ ऑगस्ट चौक दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या वितरण लाईनचे तसेच लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्र अंतर्गत रामटेकडी मुख्य जल नलिकेचे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी उपरोक्त पंपिंगचे अखत्यारीतील पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार दिनांक २५/०२/२०२२ रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी. असे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग:-

१) लष्कर जलकेंद्रअंतर्गत जलमंदिर झोन मधील संपूर्ण परिसर :- GE साउथ, GE नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, ताडीवाला रोड परिसर, कोरेगाव पार्कचा संपूर्ण भाग, पुणे स्टेशन परिसर, ससून हॉस्पिटल परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर, गणेशखिंड रोड व परिसर, पाटील इस्टेट, शिवाजीनगर इत्यादी.

2) लष्कर जलकेंद्रअंतर्गत रामटेकडी झोन मधील संपूर्ण परिसर :- संपूर्ण रामटेकडी इंडस्ट्रियल एरिया, सय्यदनगर हेवन पार्क, गोसावी वस्ती, शंकर मठ, वैदूवाडी, रामनगर, आनंदनगर, हडपसर गावठाण, सातववाडी, गोंधळेनगर ससाणेनगर, काळेपडळ, मुंढवा, माळवाडी, सोलापूर रोड डावीबाजू , केशवनगर, मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, बी.टी. कृवडे रोडवरील काही परिसर, भीमनगर, बालाजीनगर, विकासनगर, ओरीयंट गार्डन, साडेसतरानळी, महंमदवाडी रस्ता, उजवीकडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची, भेकाराईनगर, मंतरवाडी, ओताडेवाडी इ.