PMC : Water Cut : नागरिकांसाठी मोठी बातमी : शहरात गुरुवारी या भागात पाणी बंद राहणार!

HomeपुणेBreaking News

PMC : Water Cut : नागरिकांसाठी मोठी बातमी : शहरात गुरुवारी या भागात पाणी बंद राहणार!

Ganesh Kumar Mule Jan 03, 2022 12:07 PM

PMC Budget Dispute : हेमंत रासनेंच्या  अंदाजपत्रकावर आयुक्त घेणार राज्य सरकारचे मार्गदर्शन 
Aba Bagul | मनस्वी आनंद….गुणवत्तेचा आणि आदर्शवत वाटचालीचा
Big Breaking News : मोठी बातमी : गणेश  बिडकर  यांचे  सभागृह  नेते  पद  रद्द!

गुरुवारी शहरात पाणी बंद!

पुणे : गुरुवार  रोजी पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती LLR टाकीवरील व रामटेकडी टाकीवरील विद्युत/पंपिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यामुळे, अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीचे कामांसाठी  पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. दि. ०६ रोजी दुपारी १२ पासून दि. ०७ दुपारी १२ पर्यंत पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीत पर्वती एल.एल.आर टाकीचे मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडण्यासाठीचे कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार आहे व दि. ०८ रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी. असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग :-

वडगाव जलकेंद्र परिसर :-

दि. ०६/०१/२०२२ रोजी सिंहगड रोड वरील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.

पर्वती (LLR) जलकेंद्र परिसर :-

 शहरातील सर्व पेठा (दि. ०६/०१/२०२२ रोजी दुपारीपासून ते शुक्रवार दि. ०७/०१/२०२२ रोजी दुपारपर्यंत) दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर (स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, भवानी पेठ व नाना पेठ येथील भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.)

लष्कर जलकेंद्र परिसर :-

दि. ०६/०१/२०२२ रोजी GE साउथ, GE नॉर्थ, पुणे कॅन्टोनमेंटचा हद्दीचा सर्व भाग, जांभूळकर मळा, रामटेकडी, हेवन पार्क, आशिर्वाद पार्क, हडपसर, सय्यदनगर,
काळेपडळ, महंमदवाडी, ससाणेनगर, फुरसुंगी, उरुळी देवाची, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रोड, गोंधळेनगर, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी घोरपडी गाव व परिसर, वानवडी गाव, बी.टी. कवडे रोड, उदय बाग, कवडे मळा, मगरपट्टा, हांडेवाडी रोड, मंतरवाडी, सोलापूर रोडची डोबडवाडी, सोपानबाग तसेच उत्तर बाजूस फातिमा नगर, एस. व्ही नगर परिसर, सेंट पॅट्रिक टाऊन, शेवकर वस्ती इत्यादी.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0