महत्वाची बातमी | गुरुवारी पुणे शहरात पाणी बंद | शुक्रवारी कमी दाबाने पाणी
पुणे | येत्या गुरूवारी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्या. (MSEDCL) यांचे २२०/२२ KV पर्वती सबस्टेशन येथे तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामामुळे पर्वती जलकेंद्र (जुने व नवीन) व अखत्यारीतील पंपींग, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी MLR पंपींग व वडगाव जलकेंद्र येथे देखभाल दुरुस्ती विषयक काम असल्या कारणाने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा सदर दिवशीचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच कोथरूड व शिवाजीनगर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवार रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून (PMC Water dept) करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation)
पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
पर्वती MLR टाकी परिसर :-
गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.
पर्वती HLR टाकी परिसर :-
सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर,पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.
पर्वती LLR परिसर –
शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर. एस.एन.डी.टी. एम.एल.आर. टाकी परिसर :- एरंडवणा, कर्वेरोड, प्रभात रोड, लॉ कॉलेज रोड, भांडारकर रोड, हैपी कॉलनी, गोसावी वस्ती, मयूर कॉलनी, सहवास सोसा परिसर गिरीजा शंकर विहार, दशभुजा गणपती परिसर,वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रोड,गुळवणी महाराज रोड, गणेशनगर, राहुल नगर, करिष्मा सोसा, संगमप्रेस रोड, सिटी प्राईड परिसर, आयडीयल कॉलनी इ.
चतुःश्रृंगी टाकी परीसर :-
औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ, परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानाश्री सोसयटी, नॅशनल, सिंध सोसायटी, औंध गाव परिसर.
लष्कर जलकेंद्र भाग :-
लष्कर भाग, पुणे स्टेशन परीसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परीसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परीसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणी नगर, महाराष्ट्र हौसींग बोर्ड कॉलनी, वडगाव शेरी, चंदन नगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळे नगर, सातववाडी इत्यादी.
वडगाव जलकेंद्र परीसर :-
हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग वरील भाग, आंबेडकरनगर, टिळेकरनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.