Warje Multispeciality Hospital -PMC| वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील |पुणे महापालिकेच्या एक वर्षापासून च्या अथक पाठपुराव्याला यश

Dr Rajenra Bhosale - IAS - PMC Commissioner

Homeadministrative

Warje Multispeciality Hospital -PMC| वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील |पुणे महापालिकेच्या एक वर्षापासून च्या अथक पाठपुराव्याला यश

Ganesh Kumar Mule Apr 08, 2025 8:51 PM

Konkan | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकरमाफी | शासनाच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करा- जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
Free travel | Insurance cover | ७५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.मधून मोफत प्रवास | दहीहंडी पथकातील गोविंदांना 10 लाखाचे विमा संरक्षण
DA Hike | राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना 3 टक्के महागाई भत्ता देण्याची घोषणा

Warje Multispeciality Hospital -PMC| वारजे हॉस्पिटलला संरक्षण मंत्रालयाचा हिरवा कंदील |पुणे महापालिकेच्या एक वर्षापासून च्या अथक पाठपुराव्याला यश

| इसीए बेस फायनान्सिंगच्या भारतातल्या पहिल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा

 

PMC Health Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे वारजे येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल (PMC Warje Multispeciality Hospital)  प्रस्तावीत आहे, या प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा भूमिपूजन सोहळा उपमुख्यमंत्री असताना  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित दादा पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते पार पडला होता. प्रत्यक्षात काम चालू करण्याच्या आधी या हॉस्पिटलच्या बांधकामाचा झोन हा रक्षा मंत्रालयाच्या अति संवेदनशील फनेल रेड क्षेत्रामध्ये येत होता. पालिकेला याबद्दलची कल्पना डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) रुजू झाल्यावर समजले आणि त्यामुळे काम चालू करायच्या आधी रक्षा मंत्रालयाची परवानगी मिळणे गरजेचे झाले होते. संवेदनशील रेड झोन पाहता त्याबद्दलची एनओसी रक्षा मंत्रालय (Defense Ministry) कडून मिळणे फार किचकट व पाठपुराव्याचे काम होते. यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला, लोहगाव एअरपोर्ट बेस पुणे, त्यानंतर गांधीनगर रक्षा मंत्रालय बेस गुजरात, आणि त्यानंतर सर शेवटी दिल्ली रक्षा मंत्रालय असा कठीण आणि जाचक प्रवास होता.  पण आता ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यामुळे, बांधकामाचा पुढील मार्ग मोकळा झालेला आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिकेच्या, वारजे येथील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एक वर्षापासूनच्या मेहनतीच्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलेले आहे. नुकतीच या प्रकल्पाला रक्षा मंत्रालयाची एनओसी मिळाली. डॉ राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी स्वतः ही एनओसी लवकर कशी मिळवता येईल यासाठी विशेष प्रयत्न केले होते. यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे योगदान मोलाचे ठरले व तसेच  उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस आणि  अजित दादा पवार, मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्य मंत्री नागरी विमान उड्डाण व सहकार मंत्रालय भारत सरकार व चंद्रकांत पाटील, तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री, महाराष्ट्र शासन यांचे विशेष सहकार्य व मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

या पुढील टप्पा हा महाराष्ट्र राज्य शासनाच्या विहित बांधकामाच्या परवानग्या आल्यावर या प्रकल्पाचे काम चालू होणार आहे. हा प्रकल्प साधारणपणे २०२७ ला पुणेकरांच्या सेवेत रुजू करण्याचे पालिकेचे उद्दिष्ट असून, यामध्ये लागणारी संपूर्ण गुंतवणूक ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट धोरणाच्या अंतर्गत नेदरलँड येथील निम शासकीय संस्था करणार आहे, या संपूर्ण प्रकल्पाला नेदरलँड येथील शासकीय संस्थेचा इन्शुरन्स मिळालेला आहे, या संपूर्ण प्रकल्पाचा ड्राफ्ट डीपीआर रक्षा मंत्रालयात देण्यात आला.

या हॉस्पिटलमध्ये विशेष भर हा कॅन्सर आणि मदर अँड चाइल्ड केअर यावर देण्यात असून, महाराष्ट्रातील मदर अँड चाइल्ड केअर चे हे सर्वात मोठे हॉस्पिटल राहणार आहे, या प्रकल्पामध्ये जवळपास दहा ते वीस टक्के बेड हे गरजूंना रिझर्व राहणार आहे, राज्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना, या प्रकल्पामध्ये राबवण्यात येणार आहेत, प्रकल्प चालू झाल्यावर दरवर्षी पालिकेला यामधून ठराविक उत्पन्न मिळणार आहे, संरक्षण मंत्रालयाचे ना हरकत मिळाल्यानंतर आता सदर हॉस्पिटल ची जागा या प्रकल्पासाठी उपयोगात येणार आहे, डॉ राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महानगरपालिका यांनी हा प्रकल्प करत असलेल्या रुलर एनान्सर्स या संस्थेने संरक्षण मंत्रालयाची आणि इतर परवानग्या येईपर्यंत सदर जागेतील डायलिसिस सेंटर रुग्णांना गैरसोय होऊ नये म्हणून कार्यान्वित ठेवले होते.

प्रकल्प चालू झाल्यापासून कार्यान्वयीत होईपर्यंत परदेशी गुंतवणूक करणाऱ्या एफडीआय संस्था पालिकेला जवळपास साडे सतरा कोटी रुपयांची बँक गॅरंटी देणार आहे, तसेच हा प्रकल्प चालू झाल्यावर या संस्थेमार्फत पालिकेच्या माध्यमातून सुकाणू समिती या प्रकल्पावर देखरेख करेल, हा प्रकल्प आरोग्य व्यवस्थेमध्ये महाराष्ट्रातील मानांकित हॉस्पिटल म्हणून लोकांमध्ये ओळखल्या जाईल.