प्रभाग रचना सुनावणी : महापालिका प्रशासनाकडून वेळापत्रक जाहीर
पुणे : महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यावर आलेल्या हरकतींची संख्या जास्त आहे. त्यामुळे आता ही सुनावणी दि. 24 आणि 25 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. पहिल्यांदा एकच दिवस सुनावणीसाठी देण्यात आला होता. बालगंधर्व रंगमंदिरात ही प्रक्रिया पार पडणार आहे. सुनावणीसाठी सर्व हरकतदारांना नोटीस देऊन ठिकाण आणि वेळ कळविण्यात आल्याचे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाकडून याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
प्रभाग रचनेवर सुमारे 3 हजार 596 हरकती आल्या आहेत. सुनावणींसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आयोगाच्या सुचनेनुसार महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना 1 फेब्रुवारीला जाहीर करण्यात आली होती. तर 14 फेब्रुवारीपर्यंत त्यावर हरकती घेण्याची मुदत होती. तर, यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल महापालिकेस 2 मार्चला राज्य निवडणूक आयोगास सादर करायचा आहे. त्यानुसार ही सुनावणी होणार आहे. त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केला आहे.
असे असेल वेळापत्रक
दिनांक गट प्रभाग सुनावणीची वेळ
COMMENTS