Wakdewadi | Shasan Aaplya Dari | वाकडेवाडी परिसरात राबवण्यात आला  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम | संतोष लांडगे आणि सोनाली लांडगे यांचा पुढाकार 

HomeपुणेBreaking News

Wakdewadi | Shasan Aaplya Dari | वाकडेवाडी परिसरात राबवण्यात आला  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम | संतोष लांडगे आणि सोनाली लांडगे यांचा पुढाकार 

कारभारी वृत्तसेवा Dec 29, 2023 3:10 PM

PMC Pune | Recruitment | कशी झाली पुणे महापालिका भरती प्रक्रिया? | जाणून घ्या सविस्तर!
Pune PMC News | महापालिकेच्या या विभागातील तांत्रिक पदांना धोका भत्ता लागू!
Marathi Language in Administration | मायमराठी व्हावी लोक प्रशासनाची भाषा | ‘प्रशासनातील मराठी भाषा’ परिसंवादात सनदी अधिकाऱ्यांची भूमिका

Wakdewadi | Shasan Aaplya Dari | वाकडेवाडी परिसरात राबवण्यात आला  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम | संतोष लांडगे आणि सोनाली लांडगे यांचा पुढाकार

 

Wakdewadi | Shasan Aaplya Dari |शिवाजीनगर भागातील वाकडेवाडी परिसरात महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी (Shasan Aaplya Daari) हा उपक्रम राबवण्यात आला. माजी नगरसेविका सोनाली लांडगे (Sonali Landge) आणि शिवसेना विभाग प्रमुख संतोष लांडगे (Santosh Landge) यांनी यात पुढाकार घेऊन नागरिकांना आवश्यक दाखले मिळवून दिले. (Pune News)

याबाबत संतोष व सोनाली लांडगे यांनी सांगितले कि, महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या विविध योजना, तसेच विविध दाखले जसे कि, उत्पन्नाचा दाखला,  आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचा दाखला, डोमेसाईल सर्टिफिकेट, आयुष्यमान भारत योजना कार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड,  यांचा लाभ नागरिकांना व्हावा म्हणून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग होता. सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ व दाखले त्यांना या कार्यक्रमाच्या वेळी देण्यात आले. असेही लांडगे म्हणाले.

यावेळी माजी नगरसेविका सोनाली संतोष लांडगे, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद  नाना भानगिरे, महिला शहर प्रमुख पूजाताई रावेतकर, उपशहर प्रमुख संजय डोंगरे, उपशहर संघटिका श्रद्धा शिंदे, विभाग प्रमुख राकेश सपकाळ, विभाग संघटिका विमल यादव, शहर समन्वयक शंकर संगम, अमित पिल्ले, शाखाप्रमुख संकेत मोरे, शाखाप्रमुख राजेश यादव, उपशाखाप्रमुख बंटी कांबळे, सामाजिक कार्यकर्ते समाधान शिंदे, महादेव भडकवाड, उपविभाग प्रमुख विशाल डोंगरे, सुनिता पढेर, शिल्पा मारणे, सुप्रिया पाटेकर, अक्षदा धुमाळ इत्यादी उपस्थित होते