Vishwa Marathi Sammelan 2025 | तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू

HomeBooks

Vishwa Marathi Sammelan 2025 | तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू

Ganesh Kumar Mule Jan 28, 2025 9:56 PM

Swatantra Veer Savarkar | Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात सावरकरांना अभिवादन
Veer Savarkar Jayanti | स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती | फर्ग्युसन मधील खोली आज राहणार दर्शनासाठी खुली
Fergusson College | फर्ग्युसन महाविद्यालयात तीन नवीन अभ्यासक्रम

Vishwa Marathi Sammelan 2025 | तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू

| ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत कवी संमेलन, परिसंवाद, बालसाहित्यावर चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Maharashtra News – (The karbhari News Service) –  राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर येत्या शुक्रवारी ३१ जानेवारीपासून होणाऱ्या तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी वाहिलेल्या संमेलनात कवी संमेलन, परिसंवाद, बालसाहित्यावर चर्चा, कार्यशाळा, चर्चासत्र, मराठी भाषेशी संबंधित सादरीकरण यांच्यासोबतच दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. संमेलनात नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, कलाकार, संपादक यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती विश्व मराठी संमेलनाच्या नियोजन समितीच्या सदस्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने विश्व मराठी संमेलनाच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी विश्व मराठी संमेलन संयोजन समितीचे सदस्य राजेश पांडे, भटकर, सुनील महाजन, डॉ. सतीश देसाई, सुनंदन लेले, आनंद काटिकर आदी उपस्थित होते.

पांडे म्हणाले की, विश्व मराठी संमेलन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात, अँम्फी थिएटर आणि बालगंधर्व रंगमंदिरात ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत रंगणार आहे. मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्यमंचाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अँम्फी थिएटरला थोर विचारवंत प्र. के. अत्रे यांचे नाव देण्यात आले आहे. या तिन्ही दिवशी रसिकांना भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असून, सर्व कार्यक्रम विनामूल्य राहणार आहेत. संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३१ जानेवारीला सकाळी ११ वाजता होईल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार , केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधींची उपस्थिती राहणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष उषा तांबे यांची उपस्थिती राहणार आहे. या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर संमेलनातील विविध कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. संमेलनाच्या स्थळी साधारण पुस्तकांची १०० दालने राहणार आहेत. नागरिकांच्या सुविधेसाठी फूड कोर्ट राहणार आहे. संमेलनातील सर्व कार्यक्रम विनामूल्य असल्याने, अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संमेलनाचा समारोप २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे, असे पांडे यांनी सांगितले.
…..
बालगंधर्व रंगमंदिरापासून शोभा यात्रा
…..
विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनाच्या पूर्वी शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. ही शोभायात्रा बालगंधर्व रंगमंदिरापासून ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंत राहणार आहे. या शोभायात्रेत नाशिक ढोल च्या गजरात मराठमोळे फेटे बांधून ज्येष्ठ मराठी साहित्यिक, परदेशी मराठी भाषिक, कलावंत, महिला आणि युवा लेखकांचा सहभाग राहणार आहे, अशी माहिती आनंद काटिकर पत्रकार परिषदेत देण्यात आले
…….
संमेलनातील पहिल्या दिवसाचे म्हणजेच ३१ जानेवारीचे कार्यक्रम
स्थळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच
……
वेळ – सकाळी ११ ते १.०० –
– लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी सादर करते संगीतकार कौशल इनामदार
– ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांचा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान
– अभिजात मराठी समिती मान्यवरांचा सत्कार
– राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे लोकार्पण
निवेदन – अजित भुरे
…..
वेळ – दुपारी – १.१५ ते २.१५
परिसंवाद – माझी मराठी भाषा अभिजात झाली.
पुस्तक प्रकाशन – छत्रपती शिवाजी महाराज व्यक्तीचित्र – संशोधन श्री भास्कर हांडे
सहभाग – ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अभिजात भाषा पाठपुरावा समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मुळे, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे आदी मान्यवर
निवेदन – भूषण करंदीकर
…..
वेळ – दुपारी – २.१५ ते ३.३०
परिसंवाद – मराठी भाषा आणि प्रसार माध्यमे
सहभाग – ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस, ‘एबीपी माझा’च्या संपादक सरिता कौशिक, न्यूज १८ चे विलास बडे, ‘पुढारी न्युज’चे प्रसन्न जोशी, ‘साम टीव्ही’चे निलेश खरे.
निवेदन – राहुल सोलापूरकर
….
वेळ – दुपारी – दुपारी ३.३० ते ५.३०
कवी संमेलन
सहभाग – रामदास फुटाणे, अशोक नायगावकर, विठ्ठल वाघ, अरुण म्हात्रे, महेश केळुसकर, किशोर कदम, आबा पाटील, हर्षदा सुखटणकर, मेघना वर्तक, नारायण पुरी, अपूर्व राजपूत, वैभव जोशी, संकर्षण कऱ्हाडे आदी.
….
वेळ – सायंकाळी ५.४५ ते ६.४५
कार्यक्रम – मराठीचा झेंडा अटकेपार
सहभाग – आंतरराष्ट्रीय मंच उपक्रमांचे सादरीकरण आणि इतर देशातील सदस्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम
….
वेळ – सायंकाळी ७ ते रात्री १०
….
सांस्कृतिक कार्यक्रम – महाराष्ट्राची महासंस्कृती
सादरकर्ते – रत्नकांत जगताप आणि कलाकार
…..
प्र. के. अत्रे. सभागृह कार्यक्रम (अँम्फी थिएटर)
….
वेळ – दुपारी २ ते ३
विषय – मराठी बोलींच्या सर्वेक्षणाबाबत सादरीकरण
संदर्भ – डॉ. सोनल कुलकर्णी
……
वेळ – दुपारी ३.१५ ते ४.४५
विषय – अनुवाद विषयक चर्चासत्र
सहभाग – रविंद्र गुर्जर, डॉ. उमा कुलकर्णी, लीना सोहनी

———

संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे २ फेब्रुवारी रोजी होणारे कार्यक्रम
स्थळ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले मुख्यमंच
……
वेळ : सकाळी ९.०० ते १०.००
अभंगवाणी
सादरकर्ते – ज्ञानेश्वर मेश्राम, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, रोहित सरनोबत, जयेश घाडी
….
वेळ : सकाळी ११.०० ते १२.३०
मराठी उद्योजकांचे चर्चासत्र
सहभाग – उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अतुल किर्लोस्कर, विजय शिर्के, आनंद गानू, हणमंतराव गायकवाड, विलास शिंदे; निवेदन – जयू भाटकर
….
वेळ : दुपारी १२.३० ते १.३०
परिसंवाद – मराठी भाषा आणि स्त्री साहित्य
सहभाग – विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रतिभा मतकरी, फैयाज शेख, डॉ. सिसिलिया कार्व्हालो; निवेदन – उत्तरा मोने
…..
वेळ : दुपारी १.३० ते २.३०
परिसंवाद – ग्रामीण वास्तव आणि मराठी साहित्य
सहभाग – इंद्रजित भालेराव, कृष्णात खोत, प्रतिमा इंगोले, डॉ. संजीव गिरासे; समन्वय – प्रभाकर देसाई
…..
वेळ : दुपारी २.३० ते ३.३०
परिसंवाद – मराठीचे ग्रंथ वैभव
सहभाग – डॉ. अविनाश आवलगावकर, डॉ. राजा दीक्षित, मनीषाताई बाठे, रमेश वरखेडे, श्रीपाद भालचंद्र जोशी
….
वेळ : दुपारी ३.३० ते ५.००
परिसंवाद – मराठी भाषा आणि युवक
सहभाग – प्रणव सखदेव, नितीन थोरात, देवा झिंजाड, शरद तांदळे, वैभव देशमुख
….
वेळ : सायं. ६.०० ते ७.००
सांगता समारंभ व अभिनेते रितेश देशमुख यांचा ‘कलारत्न’ पुरस्काराने गौरव
विशेष उपस्थिती – केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे
…..
वेळ : सायं. ७.०० ते १०.००
स्वरझंकार – मराठी संगीताचा बहारदार नजराणा
सादरकर्ते – अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर
….

स्थळ – आचार्य प्र. के. अत्रे सभागृह
….
वेळ : सकाळी १०.०० ते ११.००
बृहन्महाराष्ट्र मंडळ सादरीकरण
….
वेळ : सकाळी १२.३० ते १.३०
परिसंवाद – अध्यात्मातील अभिजात मराठी
सहभाग – स्नेहल तरडे, मिलिंद शिंत्रे; संवादक – प्रवीण तरडे
…..
वेळ : दुपारी २.०० ते ३.००
परिसंवाद – अभ्यासक्रमातील मराठी भाषा
सहभाग – श्रीकृष्ण काकडे, पृथ्वीराज तौर, राजशेखर शिंदे, दासू वैद्य; निवेदन – संदीप सांगळे
….
वेळ : दुपारी ३.१५ ते ४.४५
परिसंवाद – मराठी भाषा आणि रोजगाराच्या संधी
सहभाग – संदीप नूलकर, भानू काळे, वसुंधरा काशीकर, विजय सरदेशपांडे; निवेदन – मिलिंद कुलकर्णी
…..

स्थळ – बालगंधर्व रंगमंदिर
….
वेळ : सकाळी ११ ते २.००
कार्यक्रम – सागरा प्राण तळमळला
….
वेळ : दुपारी २.०० ते ५.००
कार्यक्रम – चाणक्य

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0