Viksit Maharashtra Survey | ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’च्या सर्वेक्षणामध्ये नागरिकांना सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Jitendra Dudi IAS – (The Karbhari News Service) – राज्य शासनाच्यावतीने ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ करिता एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात आहे, या अनुषंगाने नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित होण्यासाठी करण्यात येत असलेल्या नागरिक सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. (Maharashtra Survey 2047)
या सर्वेक्षणात ७ सोपे प्रश्न विचारले जात असून त्याचे पर्याय निवडता येतात तसेच आवाज ध्वनीमुद्रीत (रेकॉर्ड) करता येतो. विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजनला आकार देण्यासाठी नागरिकांनी आपले अभिप्राय १७ जुलै २०२५ पर्यंत https://wa.link/o93s9m या लिंकवर नोंदवावे. ही लिंक आपल्या ओळखीच्या व्यक्तींना पाठवून त्यांनाही सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही आवाहन श्री.डूडी यांनी केले आहे.

COMMENTS